पान:जपानचा इतिहास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
૪२
जपानचा इतिहास.

 जपानी घरांना पाया घालण्याची मुळींच जरूर लागत नाहीं. घराचा मुख्य आधार कायतो खांबांवर. ते खांब जमी- नीवरच दगडी खुर्च्या तोंडाला थोड्याशा खोदलेल्या अशा ठेवून त्याजवरच ठेवितात. छपरें बहुतेक सांवळ्याचीं, लाक- डांची किंवा कौलांचीं असतात. घराच्या व इतर भागाच्या मानानें तीच फार जड असतात, व त्यांचा बहुतेक भार काय तो भक्कमशा तुळयांवरच असतो. त्या तुळ्यांना दोन ठिकाणी खांबांचे ठेके असतात. एक इमारतीच्या अगदीं टोंकाला व दुसरा त्यापासून सुमारें तीन फूट अलीकडे भां- तल्या बाजूला.

 भिती अशी संज्ञा ज्यांला देतां येईल असें जपानी घरांना कांहीं नसतें, रात्रीं निजते वेळीं लांकडी फळ्या चोहोंकडे बसवितात. त्या फळ्यांना त्यांनी आपल्या भाषेत 'पर्जन्य: द्वारे ' अशी संज्ञा ठेविली आहे. त्या फळ्या दिवसाच्या काढून पेटीत घालून ठेवतात. उन्हाळ्यांत रात्रींसुद्धां ह्या फळ्या काढून ठेवलेल्या असतात. हिंवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी लांकडी फळ्या घालतात, परंतु दिवसा किंचित् पारदर्शक अशा कागदांच्या फळ्यांचा त्यांच्या जागी उपयोग करितात.

 बसण्या उठण्याच्या खोल्यांमध्ये सुमारे ६ फूट लांब, ३ फूट रुंद, व ३ इंच जाड अशा गवती चटया पसरलेल्या असतात. खोली मोठी असेल तर पुष्कळ चटया एकमेकाला शिवून पसरलेल्या असतात. त्या लोकांमध्ये नेहमीं बहुधा कोणाचीही जागा मोजावयाची झाली तर त्या चटयांवर मो- जतात. अमूक एक खोली अमूक एक हात औरस चौरस आहे, असें आली ज्या टिकाणी हाणं; त्या ठिकाणी ते असें