पान:जपानचा इतिहास.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वे.

४१


 जपानी लोकांमध्ये स्नानापूर्वी अंग रगडून व हाडें मोडून घेण्याची वहिवाट आहे. हा धंदा करणारे लोक बहुशः आंधळेच असतात, संध्याकाळी कडोसा पडूं लागला न लागला कीं, ते हातामध्ये बांबूच्या काठ्या घेऊन व तोंडानें एखादे वाद्य वाजवीत किंवा " आंग रगडून घ्याहो आंग रगडून. आंगांतील दुखणें टाका घालवून ! " अर्से ओरडत रस्त्यानें जातांना दिसतात; किंवा ह्यांचा आवाज ऐकू येतोच. असे रस्त्याने हिंडणारे सगळे आंधळे पुरुष असतात. ज्या आं- वळ्या बायका हा धंदा करणाऱ्या असतात, त्या अशा रस्त्यानें हिंडत नाहींत, बोलावलें ह्मणजे मात्र घरी येतात.

 जपानमधल्या कांहीं जातींत पूर्वी आंगांत कांहीं कपडे वालण्याची चाल नव्हती ते आपल्या आंगावर निरनिराळ्या प्रकारची फुलें, पक्षी वगैरे गोंदून आपली आंगें सुशोभित करीत असत. महिनेच्या महिने त्रास सोसावा लागे, तेव्हां हा विधि होई. एकदांची ही चाल सरकारने कायद्यानें बंद केली आहे. प्रत्येकाने कपडे अंगांत घालण्याविषयीं कायद्याची सक्ती आहे.

_____
प्रकरण ७ वें .
जपानी लोकांची घरं.

 जपानी लोकांचीं घरें बहुतेक लांकडी असतात. व त्यांना धरणीकंपापासून फार भय असूं नये ह्मणून ती बहुतेक 'ठिकाणी एक मजली बांधलेली असतात. सर्व घरें प्रायः एकच नमुन्याची असतात.