पान:जपानचा इतिहास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७
जपानचा इतिहास.

होतां होईतों प्रत्येकजण दररोज नियमानें स्नान करितो. कांहीं व्रतोपवास असल्याशिवाय कोणी बहुतेक थंड पाण्यानें स्नान करीत नाहींत, ते ज्या पाण्यानें स्नान करितात, तें पाणी इतकें कढत असतें कीं, युरोपियन लोकांना ते अंगांवर घेववत नाहीं. टोकियोमध्ये आठशें सार्वजनिक स्नानगृहें आहेत; त्यांत तीन लक्ष लोक स्नान करून जातात, अशी गणती लागली आहे. प्रत्येक खानदानींच्या गृहांत एक न्हाणीघर असतेच. ज्या घरांत न्हाणीघर नाहीं तेथील लोक स्नानाची पंचपात्र रस्त्यावर आणून ठेवून तेथें स्नान करितात. एक वेळ तापलेल्या पाण्यांत घराच्या मालकापासून तों चाकरा- पर्यंत सर्व लोक बुचकळ्या मारून घेतात. हात व तोंड धुण्याकरितां जवळच निराळें थोडेंसें स्वच्छ पाणी ठेवलेले असतें.

 पूर्वी सार्वजनिक स्नानगृहांत नग्न स्त्रीपुरुष एकत्रच स्नान करीत असत. त्या लोकांना ह्या चालींत लाजण्यासारखें कांहीं आहे, असे परवांपर्यंत वाटत नव्हतें. स्त्रीपुरुषांनीं असें स्नान करण्याच्या वहिवाटीमुळे युरोपियन लोकांना आश्चर्य वाट- लेलें पाहून उलट त्यांनाच आश्चर्य वाटे. परंतु सरकारनें अलीकडे ह्या गोष्टीचा बंदोबस्त केला आहे.

 जपानच्या हवेला उष्ण पाण्याचें स्नानच हितावह आहे, असें दिसतें. ऊन पाण्याच्या स्नानानें थंडी, वातविकार व वर कमी होत असावेत. कित्येक उष्ण झन्यांत लोक दिव सांतून चार चार, पांच पांच वेळां स्नान करितात. मुळे थंडी वाजूं लागली कीं ऊन पाण्यांत जाऊन बसतात. कित्येक स्नान करणारे पट्टे महिना महिना पाण्यामध्ये असतात.