पान:जपानचा इतिहास.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वै.

३९


पोषाखापासून होणारे तोटेही स्पष्ट करून दाखविले; परंतु तें सर्व पालथ्या घागरीवर पाणी ओतल्याप्रमाणे झालें. जपानी लोकांना वाटतें कीं, युरोपियन पद्धतीचा आपण पोषाख केला ह्मणजे आपण सुंदर दिसतों, व दुसरें कोणी ह्या त्यांच्या मताच्या विरुद्ध बोलले तर ते फार रागावतात.

 जपानांत अलीकडे ह्या पोषाखासंबंधाने समारंभाच्या वगैरे प्रसंगी एक विलक्षण चाल दिसून येते. त्यांच्यांत स्त्रीपुरुषांचे मिश्र समाज समारंभाच्या ठिकाणीं जुळतात. त्यावेळी एकाद्या जपानी स्त्रीने जर जपानी तऱ्हेचा पोषाक केलेला असेल, तर ती आपल्या नवऱ्याच्या पाठीमागून चालते व यूरोपियन तऱ्हेचा पोषाक केलेला असेल तर ती त्याच्या पुढें चालते.

 मुलांचा पोषाक थोरांच्याप्रमाणेंच असतो. त्यांच्या डोकीला एक लहानशी टोपी असते. त्यांच्या काखेला एक पिशवी अ- सते. त्यांत एखादी भारलेली वस्तु ठेवलेली असते. त्या वस्तु- मुळे मुलांचें अपघातापासून संरक्षण होतें, असें ते लोक समज- तात. कोणाकोणाच्या गळ्यांत एखाद्या धातूचा बोट दोन बोटांचा एक लहानसा पत्रा अडकविलेला असतो; त्यावर मुलाचें नांव व पत्ता हीं लिहिलेलीं असतात. अशासाठीं कीं तो कोठें चुकला तर त्याचा शोध लवकरच लागावा.

 त्यांच्यामध्ये मुलगा तीन वर्षांचा होईपर्यंत त्याचें सबंध डोकें भादरण्याची चाल आहे. तीन वर्षांनंतर मारवाड्याप्रमाणें तीन ठिकाणी तीन शेंड्या ठेवतात. पंधरा वर्षे झाल्यानंतर मुलाचे डोके पुरुषाच्या डोक्याप्रमाणें राखतात.

 स्नानविधि - मार्गे सांगितलें आहे कीं, ऐनो लोक कधीही स्नान करीत नाहींत, जपानी लोकांचें तसें नाहीं.