पान:जपानचा इतिहास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
जपानचा इतिहास.

आमच्या देशांतल्याप्रमाणें रत्ने वगैरे घालण्याची त्या देशांत चाल नसल्याचे समजतें, घराच्या बाहेर त्या उघड्या डो- क्यानेंच हिंडतात. त्या आपले एकदां बांधलेले बुचडे आठ आठ दहा दहा दिवस सोडीत नाहींत. रात्रीं निजल्यानंतर आपले केस विसकटू नयेत ह्मणून त्या निजतेवेळीं एका प्रका रच्या लाकडी उशीचा उपयोग करितात. त्या उशीवर त्या आपले डोके न टेकतां नुसती मान टेंकून व बुचडा जमिनी - वर न लोळूं देतां निजतात.

 जपानी स्त्रिया आपला वर्ण गौर दिसावा ह्मणून आपल्या चेहऱ्याला, कानाला व गळ्याला एक प्रकारची पांढरी भुकटी लावितात, व ओठांना तांबडा रंग देतात. आपल्या नवऱ्याच्या मनांत आपल्यासंबंधानें मत्सर वाटू नये ह्मणून पूर्वीच्या काळी जपानी विवाहित स्त्रिया आपल्या भुवयांचे केस काढून व आपल्या दांताला काळा रंग लावून आपणाला विद्रूप करून घेत असत. परंतु हलांच्या बादशाहीणीनें तसें करण्याचे नाकारिलें. तेव्हांपासून ही चाल प्रचारांतून जाऊं लागली आहे.

 बायकांचे पंखे उघडून मिटण्यासारखे नसतात. तसले पंखे पुरुषांच्या जवळ असावयाचे. इ. स. १८८६ सालापासून आपला रमणीय असा पोषाक टाकून देऊन जपानची राणी युरोपियन स्त्रियांप्रमाणे पोषाख करूं लागली आहे; व दरबा- बच्या इतर स्त्रियांसही तसलाच पोषाक घालण्याविषयीं ती उपदेश करीत असते. युनायटेडस्टेट्सच्या प्रेसिडेंटाच्या स्त्रीनें व इतर अमेरिकन स्त्रियांनीही ह्या राणीनें स्वीकारलेल्या पो- पाखाबद्दल आपली उघड उघड नाखुपी दर्शविली व तशा