पान:जपानचा इतिहास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वै.

३७


लष्करांतील 'जनरल' प्रमाणेच असतो. पुरुषांच्या किमान • पेक्षां स्त्रियांचा किमान अधिक तुस्त असतो; व तो घोट्या- पर्यंत लांब असतो. त्यांचा कंबरपट्टा केव्हां केव्हां एकेक फूटपर्यंत रुंदीचा असतो, तो कंबरेला अशा तन्हेनें गुंडाळ- लेला असतो कीं, मागच्या बाजूला त्याला थोडें पोंग यावें. मागच्या बाजूला त्याचे सोगे लांब लांब सोडलेले असतात. त्यामुळे जपानी स्त्रिया उभ्या असल्या तरी वांकल्याप्रमाणे दिसतात.

 पानी स्त्रिया दरबारांत जातेवेळी पांढरा, किरमिजी अथवा दुसऱ्या कसल्या तरी रंगाचा चित्रे काढिलेला पायघोळ रेशमी झगा अंगांत घालतात. व त्या आपले केस मोकळे खांद्या- वरून पुढच्या बाजूला आणून सोडतात.

 जपानी स्त्रिया आपल्या केसांची जोगवण फार मेहनतीने करितात, त्यांचे केस काळेभोर असून दिसण्यांत सुंदर पण जरा राठ दिसतात. त्या आपले केस चहाच्या बियांचे मौल्यवान तेल लावून फार नरम करितात. त्या तेलाच्या योगानें जपानी स्त्रियांचे केस काळेभोर, तुळतुळीत व रेशमा- प्रमाणे दिसून टांचेपर्यंत त्यांच्या पाठीवर लोळत असतात. त्या आपले केस पुढच्या बाजूला थोडेसे वर उचलल्यासारखे दाखवून त्यांचा मागच्या बाजूला बुचडा बांधितात. तो बुडा त्या मोठमोठ्या सुया त्यांत खोचून नीट आवळून घेतात. व कधीकधी फुलांच्या गजांनी त्याला विशेष शोभा आणितात, त्यांच्या केस विंचरण्याच्या फण्या व बुचड्यांत खोवात्रयाच्या सुया कासवाच्या पाठीच्या, पोंवळ्याच्या व मौल्यवान् धातूंच्या वगैरे असल्यामुळे त्या किंमतीने फार महाग असतात. पण