पान:जपानचा इतिहास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
जपानचा इतिहास.

अडकवन ठेवीत असत. परंतु नेहमी दोन तरवारी बरोबर बाळगल्यानें खून फार होतात जसा जपान सरकारचा समज झाल्यामुळे त्या सरकारने इ. स. १८७६ ह्या वर्षी दोन तरवारी बरोबर बाळण्याची कायद्यानें मनाई केली. समारं भाच्या दिवशी हे लोक पोकळ तुमानी व अंगांत आंगाबरोबर असे रेशमी आंगरखेही घालतात. पूर्वीचे जपानी आपल्या ताळूवरची हजामत करून मार्गे राखलेली शेंडी तिजवर पुढे आणून चांगली विंचरून बसवीत असत. आलीकडचे जपानी आपले केस 'युरोपियन लोकांप्रमाणे राखतात. स्त्रियांनी मात्र आपले केसाचे बुचडे वगैरे बांधण्यांत आपली पूर्वीचीच पद्धति कायम ठेवली आहे. वर सांगितलेल्या पोषाकाखेरीज एक पंखा, एक लहानशी छत्री, व कंबरेला एक तंबाकूची डबी आणि चिलीम येवढे जिन्नस झाले, ह्मणजे जपानी लोकांचा फुलड्रेस झाला.

 परवांपर्यंत जपानी दरबारची अशी चाल होती की, को- नाही गृहस्थास बादशहापुढे भेटावयास जावयाचे असले तर त्यानें पायांत अशा तऱ्हेची तुमान घातली पाहिजे कीं, तिची लांबी जितकी तळपायांपासून गुढग्यापर्यंत असेल तितकीच आणखी तळपायाच्या पुढेही असावी. अशा तऱ्हेची विजार पायांत घालून मनुष्य चालू लागला ह्मणजे जणूं कांहीं तो मनुष्य गुढग्यावर चालतो आहे असें दिसावें.

 इ. स. १८७३ सालीं सरकारने असा कायदा केला आहे कीं, सरकारी अंमलदारांनीं सरकारी कामाच्या वेळीं जपानी पोषाक न घालता युरोपियन तऱ्हेचाच पोषाख घातला पाहिजे. अलीकडे जपानी बादशहाचा पोषाख बहुधा नेहमीं युरोपियन