पान:जपानचा इतिहास.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ६ वै.

३५


असतात. त्यामुळें ते वाटेनें चालूं लागले ह्मणजे खडखड असा फार आवाज होतो. त्या लोकांचें डोकेँ बहुतेक उघडें असतें; व घातलीच तर ते केव्हां तरी गवताची मोठी टोपी घालतात. फारच पाऊस पडत असला, ह्मणजे हे लोक वरून एक गवताचा अंगरखा अंगांत घालतात.

 जपानांत अशी चाल आहे कीं, जो मनुष्य ज्या पदवीचा व दर्जाचा असेल त्याने त्याच पदवीचे व दर्जाचे इतर लोक जो पोषाक घालीत असतील तोच पोषाक घालावा. असे प्रत्येक पदवीच्या लोकांचे पोषाख ठरीव आहेत.

 'जपानांत शेळ्या मेंढ्या पूर्वीपासून नसल्यामुळे त्या लोकांत पूर्वी लोकरीचा पोषाक घालण्याचा परिपाठ नव्हता. कापूस, ताग व रेशीम ह्या तीन्हीचींच वस्त्रे फक्त वापरीत असत.

 किमानो नांवाचा एक आंगरखा त्यांच्यांतील स्त्री पुरुष उभयतांतही वारतात. हा आंगरखा पुढच्या बाजूनें मोकळा असून तो कंबरपट्यानें अंगाशी आवळलेला असतो. हा किमानो श्रीमंत लोक उन्हाळ्यामध्ये हलक्या व झिरझिरीत वस्त्राचा असा सुती वापरतात, व हिवाळ्यामध्ये जाडी रेश-माचा वापरतात. त्या अंगरख्याच्या अस्तन्या कोपराखाली दुहेरी असतात, व त्यांचा त्यांना खिशाऐवजी उपयोग होतो. ह्या खिशांत प्रत्येक जपान्याजवळ बहुधा एक काग- दाचा दस्त रुमाल असावयाचाच. पूर्वी लढवय्ये लोक हमेशा आपल्याबरोबर दोन तरवारी बाळगीत असत. त्या तरवारी ते ह्या किमानोच्यावर कंबरेला बांधलेल्या कंबरपट्याला