पान:जपानचा इतिहास.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
जपानचा इतिहास.

त्याही गोष्टीचा पिच्छा पुरविणारे असतात. एकंदरीत जपानी लोकांनी अलीकडे आपली विलक्षण उन्नति करून घेतली. आहे, ह्यांत संशय नाहीं.

प्रकरण ६ वें .
जपानी लोकांचे पोषाक.

 जपानी लोकांच्या पोषाकाच्या भिन्न भिन्न तन्हा आहेत. खेड्यापाड्यांतील लोकांची उन्हाळ्यांतील वस्त्र सामुग्री हाटली म्हणजे फक्त एक लंगोटी असते. आलीकडे जपानी सरका- राने असा एक कायदा केला आहे की, कोणत्याही मनु- ध्यानें नुसती लंगोटी घालून शहरांतून केव्हांही हिंडूं नये. त्यामुळे शहरांत जातेवेळी हे लोक असें करितात कीं, आप- ल्याबरोबर एक पोकळ व पायघोळ आंगरखा खाकोटीला मारून घेतात; व शहरांत गेल्यानंतर पुढें एखादा पोलिस शिपाई पाहिला कीं, तो अंगांत घालतात. मजूरदार लोकां- पेक्षां शेतकरी लोक अधिक सुखी असतात. त्यांचा उन्हा- 'ळ्यांतील पोषाक झटला ह्मणजे अंगांत एक पायघोळ आंग.. रखा व पायांत गवताच्या वाहणा. त्यांचे आंगरखे तागाचे अगर जाडीभरडी सुताचे असतात. हिंवाळ्यामध्ये जपानी शेतकरी एक तुस्तसा चोळणा व फक्त आंगठ्याकरितां निराळी जागा ठेवून शिवलेला पायमोजा पायांत वालतो. ही आंगठ्याची पृथक् सोय वहाण आंगव्यांत व इतर बोटांत अडकवितां येण्याकरितां केलेली असते. पाव- साळ्यामध्ये ह्या त्यांच्या वहाणा लाकडाच्या केलेल्या