पान:जपानचा इतिहास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वै.

३३


लोकांना ज्याप्रमाणें आह्मी लेखीत आलों, त्याप्रमाणें ते व्यापा- यांना व दुकानदारांना लेखीत असत.

 पूर्वीच्या काळीं जपानी लोक फार आदरातिथ्यशील असत. सरदार वगैरे लढवय्ये लोकांची वागणूक स्वच्छ असून मनो- हर वस्तूंचा त्यांना फार शौक असे, ते मोठे अभिमानी असत. त्यांना अनूची इतकी विलक्षण चाड असे कीं, प्रसंगविशेषीं ते तिजकरितां प्राणही खर्ची घालण्यास मार्गे पुढें पहात नसत. परंतु ते मोठे खुनशी व दीर्घद्वेषी असत. मिकाडोवर निष्ठा ठेवावी व परकीयांचा द्वेष करावा, ह्यांतच त्यांच्या देशाभिमानाचें पर्यवसान होत असे.

 आतांचे जपानी लोक पूर्वीच्यासारखे आदरातिथ्यशील नाहींत, असा त्यांच्यावर एक आक्षेप आहे. जपानी विद्यार्थी चुणचुणीत, विद्याप्रिय व मेहनती असतात; तथापि श्रमसात- त्य व बुद्धीची विशालता हे दोन गुण त्यांच्या ठिकाणीं कमी असतात' असें ह्मणतात. आमच्या लोकांत ज्याप्रमाणें अति- प्राचीन काळापासून अध्यात्मविद्येचा व तत्वज्ञानाचा ख चालला आहे, तसें जपानी लोकांत नाहीं. यांचा स्वभाव अगदी पोरकट आहे; खावें, प्यावें, आणि मौज मारावी. नवीन कांहीं दिसलें कीं, त्याचा हव्यास धरावा व लवकरच त्याचा पुन्हां कंटाळाही करावा. एकंदरीत ते स्वभावाने चांगले व दुसऱ्याशी सहनशीलपणाने वागणारे आहेत. त्यांच्यापैकीं सर्व जातीच्या लोकांना आपल्या देशाचा फार अभिमान वाटतो. पोकळ डौल हा त्यांचा अंगस्वभावच आहे ह्यटलें तरी चालेल. श्रमसातत्य हा गुण त्या लोकांत कमी आहे असें वर सांगितलें, तथापि त्यांच्यापैकी पुष्कळ जण कोण-