पान:जपानचा इतिहास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
जपानचा इतिहास.

भरणा विशेष आहे. दुसरा जो वर्ग आहे, त्याचा वर्ण गोरा, चेहरा लांबट, बांधा सडपातळ, व डोळे बदामाच्या आकृतीचे असतात. गालफडे किंवा तोंड यांपैकीं कांहींही त्यांचे विशेष पुढे आलेलें नसतें. त्यांचें नाक सरळ व लांब असून नाजूक दिसतें. हे लोक गर्भश्रीमंत किंवा इनामदार, जहागिरदार अशा वर्गांत सांपडतात. व त्यांची वस्ती उत्तरेपेक्षां दक्षिणे- कडे अधिक आहे. देश जिंकणाऱ्या वर्गातले हे लोक असे मानण्याची चाल आहे.

 जपानी पुरुषांपेक्षां जपानी बायका अधिक सुस्वरूप असतात. साधारणतः कोणत्याही जपानी मुलीचा वर्ण गोरा, गाल गुलाबी, व मुखकमल सुंदर असतें. आणि केस बांध • ण्याच्या नानाप्रकारच्या मनोहर घाटणींनीं, पद्धतशीर रीती- भातीनें, आणि मोहक स्वराने त्यांचें सौंदर्य विशेष खुलून दिसतें. त्या लवकर तरुण दिसूं लागतात त्यांचें तारुण्यही लवकर संपतें.

 निरनिराळ्या जातीच्या व पदवीच्या जपानी लोकांचे स्वभावभेद निरनिराळे असतात. व कित्येकांच्यांत अलीकडे पूर्वीच्याहून फार अंतर पडलें आहे.

 अलीकडे जपानी लोकांचें इतर देशांशीं दळणवळण होऊं लागण्यापूर्वी जपानी लोकांची अशी समजूत होती कीं, थोर लोकांच्या पदवीला शोभेसा धंदा हाणजे एक लढाईचा किंवा धर्मोपाध्यायाचा. त्यांच्या शूर लोकांपैकी पुष्कळ शूर लोक शिकलेले व विद्वान् असे असत. परंतु विद्येला ते तितकी किंमत देत नसत. लढवय्ये लोक व्यापारी लोकांचा फार तिटकारा करीत. आमच्या देशांत महार, मांग वगैरे