पान:जपानचा इतिहास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ वे .

३१


एक आर्यन ( बहुतेक युरोपियन, इराणी, व हिंदु ) ब दुसरा सेमेटिक ( अरब, यहुदी वगैरे).अमेरिकन वर्गाच्या कातडीचा वर्ण तांबूस, केस काळे व राठ, गालांची हाडे ऊंच व डोळे खोलगट असतात. इथियोपियन लोकांमध्यें शिद्दी लोकांचाच पुष्कळ भरणा आहे. एशि- 'याच्या दक्षिणेला हिंदी समुद्रांमध्ये व पासिफिक समुद्रांमध्यें जी बेठें आहेत तेथील लोक ' मॅले ' वर्गांपैकीं होत. चिनो व जपानी वगैरे लोक मांगोलियन वर्गात मोडतात.

 जपानी लोकांचे स्वरूप - जपानी लोकांच्या कात- डीचा वर्ण पिवळसर असतो. त्यांचे केस काळे असून सरळ असतात. कुरळे नसतात. त्यांच्या दाढीचे केस विरळ अस- तात. व त्यांचीं गालफडें वर उचलून आल्यासारखी दिस- तात. युरोपियन लोकांशी तुलना करून पाहिली असतां जपानी टोकांच्या डोक्याची कवटी मोठी असते. पायाच्या तंगड्या आखूड व वरचा भाग लांब असतो. एकंदरीत त्यांची ठेवण लहान असते. सरासरीच्या मानानें युरोपियन स्त्रियांच्याइतकी जपानी पुरुषांची उंची असते. बायका त्या• मानानें लहान असतात.


 जपानी लोकांतही दोन वर्ग आहेत.एकाचें मांगोलियन वर्गाशी दुसऱ्यापेक्षां अधिक साम्य आहे. त्यांचा वर्ण विशेष काळा असतो. त्यांची आकृति विशेष खुजी असते व त्यांच्या हाडापेराच्या ठिकाणी विशेष बळकटी असते. त्यांचा चेहरा थापुटका असून वाटोळा असतो. नाक नकटें असतें, तोंड मोठें असतें, व बहुतकरून नेहमीं उघडें असतें. ह्या जातीचा संचार विशेषतः उत्तरेकडे आहे; व खेड्यापाड्यांतून त्यांचा