पान:जपानचा इतिहास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
जपानचा इतिहास.

 आर्य लोकांना ज्याप्रमाणें हिंदुस्थानांत रानटी लोक आढळले त्याप्रमाणे त्यांनाही आढळले. आर्य लोकांनी हिंदु- स्थानांतील मूळच्या रहिवाशांना राक्षस असें नांव दिलें व ह्या लोकांनीही मूळच्या रहिवाशांना 'एबिसु ' ह्मणजे रान• वट अशी संज्ञा दिली. येथें ज्याप्रमाणें राक्षसांचा पुरा मोड करण्यास आर्य लोकांना पुष्कळ वर्षे फार कष्टानें झुंझावें लागलें, त्याप्रमाणें 'एबिसु' लोकांस नरम आणण्यासही जपानी मांगोलियन लोकांना फार मेहनत घ्यावी लागली. त्या ' एबिसु ' लोकांपैकीं कांहीं लोक 'ऐनो' जातीचे असून आणखीही कांहीं जाती होत्या. शेंकडों वर्षे झुंजल्यानंतर ते लोक कोठें थोडे नरम आले. त्यांच्यापैकीं कांहीं दास्य स्वीका- रून राहिले व कांहीं ' येझो ' बेटाकडे निघून गेले. काल- वकरून ' येझो बेटाशिवाय अन्यत्र ठिकाणी दोन्ही जाती एकवटून गेल्या.

 ह्या जगांतील मनुष्य जातीचे ठोकळ मानानें एकंदर पांच वर्ग केले आहेत. ( १ ) कोकेशियन ( २ ) मांगो- लियन ( ३ ) अमेरिकन ( ४ ) इथिओपियन ( ५ ) मलई. ह्या पांच वर्गापैकी पहिल्या वर्गाचे लोक यूरोपखंड, पश्चिम एशिया व उत्तर अमेरिका येथेच विशेष आहेत. त्यांचा चेहरा गुबगुबीत, कातडीचा वर्ण व केसाचा वर्ण नाना- प्रकारचा, व बुद्धीमध्ये वर्चस्व असतें. कॉकेशस पर्वताच्या आसमंतांत भागाहून प्रथम हे लोक चोहोंकडे पसरले ह्मणून त्यांस कॉकेशियन असें ह्मणतात. अद्यापपावतोही त्या पर्वताजवळ राहणाऱ्या लोकांच्या देखणेपणाबद्दल प्रसिद्धि आहे. भाषेप्रमाणें ह्यांत पुन्हां आणखी पोटभेद झाले आहेत.