पान:जपानचा इतिहास.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ५ चे .

२९


मरते समय १६८ वर्षे वयाला झाली होतीं. हा बादशहा ख्रिस्ती शक आरंभ होण्यापूर्वी नुकताच वारला होता.

 मोठमोठे इतिहासकार असें ह्मणतात कीं, इझानमी व झानगी ह्यांच्या गोष्टींत जितका तथ्यांश आहे तितकाच ह्या ' जिम्मू- टेन्नोच्या ' च्या हकीकतींत आहे. ख्रिस्ती शकापूर्वी ६८० पासून सुमारें तेराशें वर्षे कालमापनाचा वगैरे सर्व घोटाळा आहे. त्यांत तथ्याचा फार अल्पांश आहे. इ. स. ४६० पर्यंत खऱ्या इतिहासाला कांहींच आरंभ होत नाहीं व पुढेही दिलेल्या इतिहासावर फार विचार करून विश्वास ठेवावा लागतो.

_______
प्रकरण ५ वें.
जपानी लोक वास्तविक कोठून आले ? व आहेत कोण ?

 आतांपर्यंत 'आपल्या उत्पत्तीविषयीं जपानी लोकांचे काय तर्क आहेत ? तें सांगितलें. व जपानी लोक जपानांत नव्हते, तेव्हांपासूनही ऐनो लोकांची तेथें वस्ती आहे हें मागें सांगि तळेंच आहे. तेव्हां जपानी लोक जपानांत आले कोठून असा प्रश्न साहजिक उत्पन्न होतो. त्याचें उत्तर असें कीं, ज्याप्र- मार्णे अतिपूर्वकाली संपूर्ण आर्य लोकांचा झरा अथवा उगम - स्थान ह्मणजे मध्य एशियामध्यें काकेशस पर्वताच्या पायथ्या- जवळ, त्याप्रमाणे चिनी व जपानी वगैरे मांगोलियन वर्गाच्या लोकांचे आगर ह्मणजे उत्तर एशिया. ज्याप्रमाणे आर्यलोक इकडे पश्चिमेकडे युरोपांत व पूर्वेकडे हिंदुस्थानांत शिरले व तेथें त्यांनी वस्ती केली, त्याप्रमाणेंच मांगोलियन लोकही चो- होंकडे पसरले व त्यांनीं आपली ठाणी चोहोंकडे बसविलीं. यांतच ते जपानमध्येही घुसले.