पान:जपानचा इतिहास.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
जपानचा इतिहास.

असा आहे, व टेनों शब्देकरून ' स्वर्गाचा राजा' असा अर्थ होतो. 'जिम्मूटेन्नो' ह्या संयुक्त शब्दाचा सांप्रतकाळीं 'बादशहा' ह्या अर्थी उपयोग करितात. टेनो शब्दाच्या ठिकाणी 'टेन्शी' ह्मणजे 'ईश्वरपुत्र' हा शब्द फार योज तात. बादशाही चिन्ह ह्मणून 'जिम्मू- टेनोला' दोन वस्तु मिळाल्या. एक तरवार व दुसरा वाटोळा आरसा. आरसा मिळाला त्यावेळीं त्याला पुढीलप्रमाणें उपदेश झाला. " माझी तसबीर जो हा आरसा तो तूं घे. तुझें राज्य यावत् हीं सूर्य व पृथ्वी आहेत तोपर्यंत टिकेल.' हीं चिन्हें 'आइस' येथील सूर्यदेवतेच्या देवळांत ठेविली आहेत. व हणून तें स्थान यात्रेचें एक प्रख्यात ठिकाण होऊन बसले आहे.

 'जिम्मू- टेन्नोनें' संपूर्ण जपान देश काबीज केला व नंतर त्याने कृषिकर्मकरून आपले मन रिझविलें. त्यानें निर- निराळ्या वनस्पतींची जपान देशांत लागवड केली असें मानण्याची चाल आहे. त्याला आतां लोक ईश्वर मानितात व त्याच्याकरितां हजारों देवालयें बांधिली आहेत, त्यांत ते त्याची प्रतिदिवशीं पूजा करितात.

 जिम्मूच्या नंतरचा बादशहा मरण पावल्यानंतर जपानच्या इतिहास ग्रंथामध्यें पक पांचशे वर्षांची खांड आहे. त्या पांचशे वर्षांचा इतिहास ह्मणजे कोणच्या साली कोणता राजा गादी- वर बसला, त्यानें आपल्या राजधानीचे शहर कोणतें केलें, तो कोणत्या वर्षी मेला, व त्याचें प्रेत कोणत्या ठिकाणीं पुरलें आहे, एवढ्याविषयींच लिहिलेलें असावयाचें. तदनंतर 'सूजिन टेन्नो' बादशहापर्यंत आपण येऊन पोंचतों. ह्या बादशहाला