पान:जपानचा इतिहास.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थे.

२७


आमतेरसु ह्मणजे सूर्यदेवता ही डाव्या डोळ्यापासून उत्पन्न झाली व चांदोबाची स्वारी उजव्या डोळ्यांतून निघाली. सर्वोच्या मागून त्याच्या नाकामधून ' उद्धत नर' उत्पन्न झाला. ह्या आपल्या तीन अपत्यांला इझानगीनें आपलें राज्य विभा- गून दिले.

 सूर्यदेवतेचें व 'उद्धत नराचें' खडाजंगीचें भांडण झालें. त्यांत, सूर्यदेवतेचा पराभव होऊन ती एका डोंगराच्या को- पन्यांत जाऊन लपून बसली. बाकीच्या देवांना ती बाहेर यावी ह्मणून फार इच्छा होती. त्यांनी तिचें मुख ज्यांत प्रतिबिंबित होईल असा एक आरसा निर्माण केला व तो तिला दाखवून भुलवून बाहेर आणिलें. हा आरसा तिनें जपानच्या बादशहाच्या पूर्वजांस दिला आहे ह्मणतात.

 सूर्यदेवतेनें स्वर्गाहून आपला एक नातू जपानावर राज्य- करण्याकरितां पाठविला. आपल्या स्वर्गीय तरवारीनें त्यानें : आपल्या पायांखालची जमीन चांचपून पाहिली, व कियु • शियूच्या पश्चिम किनान्यावर त्यानें आपली राजधानी स्थापन केली. त्याच्या मागून जीमूटेनो हा गादीवर बसला. त्याने इ. स. पूर्वौ ६८५ पासून ६६० पर्यंत राज्य केलें. ह्या बादश- हापासून जपानी इतिहासाला आरंभ झाला असें समजतात.

 प्रस्तुतकाळीं जपानावर राज्यकरणाऱ्या वादशहाचा जिम्मू- टेनो हा मूळ पुरुष असें मानण्याची चाल आहे. तूर्त जपा- नच्या गादीवर जो बादशहा बसला आहे तो ह्या मूळपुरुषा. पासून एकशे एकविसावा पुरुष आहे, असें ह्मणतात. जपानचे बादशहा सूर्यवंशी असल्यामुळे सूर्यदेवतेची राज्यांत मोठी मान्यता व प्रतिष्ठा आहे. जिम्मू शब्दाचा अर्थ 'रणदेवता'