पान:जपानचा इतिहास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
जपानचा इतिहास.

देशच काय परमेश्वरानें प्रथम निर्माण केला. 'कोजीकी ' नांवाचा जो त्यांचा पुराणग्रंथ आहे ह्मणून सांगितले. त्या ग्रंथांत जपानच्या उत्पत्तीविषयीं येणेंप्रमाणें हकीगत आहे:-

 "हें जग निर्माण होण्यापूर्वी देवांचे अनेक वंश होऊन गेले. ह्या देववंशांपैकी शेवटच्या वंशांत इझानमी व इझानगी नांवाचीं बहीणभावंडे होती. एके दिवशीं तीं दोघें आकाशाच्या कांठाला एका ढगांच्या आश्रयानें खालीं खवळून गेलेल्या समुद्राकडे पहात होतीं. इतक्यांत इझानगीच्या हातांतील रत्नजडित व अत्यंत शोभायमान अशा भाल्याचें टोंक एकाएकीं निसटलें तें थेट खाली समुद्रांत जाऊन पडलें. त्याच्या योगानें वर जे पाण्याचे थेंब उडाले तीं बेटें बनली. त्यांपैकी अवाजी हैं। बेट प्रथम निर्माण झालें. त्या बेटावर तीं दिव्य बहीणभावंडें, होऊन राहिली. त्याच वेळीं होंडो, कियुशीयु, व शिकोक वगैरे आणखी सात बेठें निर्माण झालीं. अशाच रीतीनें आप- ल्या देशाची उत्पत्ति झाली. अशी त्या लोकांची बळकट सम- जूत होती, ह्मणून आजपर्यंत आपल्या देशाला 'देवांचा प्रदेश,' 'पाषाणभूत सलिलबिंदु' अशा संज्ञा ते देत आले.

 अग्निदेवतेचा जन्म हैं इझानमीच्या मरणाला कारण झालें. तिला परत बोलावण्याकरितां तिचा नवरा पाताळापर्यंत गेला. परंतु ती अगदीं कुजून पडली होती व तिच्या ठायीं आठ इंद्र (मेघगर्जनेचे देव) बसले होते. तेथून तो जपानच्या नै- ऋत्य कोपन्याला आला. तेथे एका प्रवाहामध्यें स्नान करून इझानगीनें आपणास शुद्ध करून घेतलें. तो स्नान करून बाहेर येतो तो बाहेर ठेवलेल्या त्याच्या कपड्यांपासून व त्याच्या प्रत्येक अवयवापासून एकेक देव उत्पन्न झाला. त्यांपैकी