पान:जपानचा इतिहास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

२५

-०००००-
आपल्या स्वतःच्या उत्पत्तीविषयीं जपानी लोक
काय ह्मणतात ?

 प्राचीनकाली जपानी लोकांना लिहिण्याची कला अवगत नव्हती. जपानचा अति प्राचीन काळचा ग्रंथ जो 'कोजीको ' हणजे 'पुरातन गोष्टींची बखर' तो इ. स. ७१२ ह्या वर्षी लिहिला गेला. त्यांत वर्णिलेल्या गोष्टी, त्याची रचना होण्यापूर्वी तेरा वर्षीच्या आधीपासून घडलेल्या आहेत. ह्यास जपानी इतिहासरूप पुराण असें नांव देण्यास कांहीं हरकत नाही. राष्ट्राच्या बाल्यस्थितीत अशाच प्रकारचे इतिहास प्रथम निर्माण होत असतात, त्या इतिहास ग्रंथां- मध्ये काल्पनिक गोष्टींचा भरणा विशेष असतो. आपल्या देशांतील राजेरजवाडे यांनी ज्याप्रमाणें आपल्या वंशाचें मूळ सूर्यापर्यंत अगर चंद्रापर्यंत नेऊन पोचवून आपणास सूर्य- वंशी किंवा चंद्रवंशी अशी नांवें धारण केलीं आहेत, त्याम- माणें जपानी लोकांनीही केलें आहे. अगदीं परवांपर्यंत जपानी राजांना ईश्वरांश मानून त्यांची ते पूजा करीत असत.

 आजपर्यंत जगांतील राष्ट्रांसंबंधानें आपण असा एक चमत्कार पहात आलों आहों कीं, ज्या त्या राष्ट्राला सर्व पृथ्वीमध्ये आपणच काय ते श्रेष्ठ असें वाटतें. परमेश्वराची मर्जी काय ती आपणावर, इतर राष्ट्रांतील लोक आपल्याहून कमी दर्जाचे, आपल्या इतकी त्यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टि नाहीं, असेंच जें तें राष्ट्र आजपर्यंत मानीत आले आहे,हा अभिमान वृथा आहे, परंतु तो प्रत्येक राष्ट्रांत असतो, त्याप्र- माणे जपानांतही आहे. ते लोक असे समजतात कीं, आपला