पान:जपानचा इतिहास.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
जपानचा इतिहास.

आहे असें ते मानितात ! पारधींत मारलेल्या आस्वलांच्या डोकीच्या कवट्या घरांच्या भोंवती खांबावर भडकवून ठेवलेल्या असतात.

 ते लोक भुताखेतांची पूजा करितात, ज्यापासून त्यांना नेहमींचें अन्न मिळतें तो समुद्र, अरण्य व इतर सृष्ट पदार्थ यांचीही ते पूजा करितात. त्यांच्या धर्माचं मुख्य चिन्ह ह्यटलें ह्मणजे मुले ज्याप्रमाणें आपल्या पेन्सिलीवर विद्यापटी, बाळपट्टी काढतात, त्याप्रमाणें केलेल्या अशा सुमारें दोन तीन फूट लांबीच्या काठ्या असतात. जीं स्थानें पवित्र मानली असतात, तेथे किंवा ज्या स्थळीं भयाचे चिन्ह असेल त्या ठिकाणीं ह्या काठ्या पुरलेल्या असतात. वाद- ळाचीं चिन्हें दिसूं लागलीं तर ह्यांपैकीं एकादी काठी समु- द्रांत फेंकून देतात.

 ऐनो लोक परमेश्वराची प्रार्थना करते वेळी आपले दोन्ही हात डोकीच्या वर उचलून धरितात. त्यांच्या प्रार्थनेचा एक नमुना पुढे दिला आहे.

 " जो आमचें पोषण करितो त्या समुद्रास व जें आमचें रक्षण करितें त्या अरण्यास, आम्ही आपले आभार समर्पण करितों. एकाच मुलाचें संगोपन करणाऱ्या अशा तुझी दोन माता आहां, याकरितां एकीकडे जाण्याकरितां जर मी दुसरीला सोडलें तर रोष मानूं नका."

 येझो बेटाचा विस्तार लंका बेटाएवढा होईल. येझो बेटांत ऐनोंची वस्ती सारी सतरा हजार आहे. त्यांच्यापैकी बहु-) तेकजण किनान्या लगतच राहतात. जपानांतील मूळचे रहिवासी जे हे ऐनो लोक, ते मागे पडून, बाहेरचे तेच घरचे होऊन बसले आहेत.