पान:जपानचा इतिहास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रे.

 ऐनो लोक आपला उदरनिर्वाह शिकारीवर करितात. ते मासे मारूनही खातात व जंगलांतील वनस्पतीवरही आपला चरितार्थ चालवितात. अन्न मिळविण्याच्या कामांत स्त्रिया पुरुषांना बरोबरीने मदत करितात. केव्हां केव्हां त्या पुरु- षांच्याही वर ताण करितात. शिकारीमध्ये कुतऱ्यांचा उपयोग करितात. त्यांच्या होड्या एकाच झाडाचा सबंध खोड पोख- रून केलेल्या असतात.

 ऐनो लोक फार अमंगळ रीतीनें वागतात, ते स्नान कधीही करीत नाहींत ह्यटलें तरी अतिशयोक्ति होणार नाहीं. त्यांना दारूचें व्यसनही फार आहे. तरी ते स्वभावानें मायाळू व सभ्य असून फार प्रामाणिक असतात. कोणालाही नम- स्कार करावयाचा झाला तर ते आपले दोन्ही हातांचे तळवे वर उचलून करतात व आपली दाढी चोळतात.

 ऐनो लोकांना ठाऊक आहे, असे सर्वात वरिष्ट जनावर जें आस्वल त्या आस्त्रलाविषयीं त्या लोकांमध्ये एक विलक्षण धर्मबुद्धि जागृत असते. त्यांच्या कुत्र्यांनीं एकादें अस्वलाचें पिलूं शिकारीत धरलें ह्मणजे ते त्या पिल्लाला घरी घेऊन येतात. तेथे त्यांच्यापैकीं एक बाई त्याचें पोटच्या पोराप्रमाणें दूध वगैरे पाजून संगोपन करिते. तें थोडेसें मोठें झालें ह्मणजे मासे वगैरे देऊन त्याचें उदरपोषण करितात. कांहीं महिन्यांनंतर तें बरेंच मोठें दिसूं लागतें. मग ते एक मोठी 'थोरली मेजवानी करितात व त्या ठिकाणीं त्याचा विवक्षित रीतीनें वध करितात, आणि अनेक प्रकारचे विधी करून नंतर त्याला खातात. आस्वलाला मारून ते लोक खातात खरे, परंतु आस्वल हैं एक उच्च जातीचें पवित्र जनावर