पान:जपानचा इतिहास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
जपानचा इतिहास.

हे ऐनो लोक मुख्य जपानांतून बहुशः संघालियन बेटांतून आले असावेत. कारण त्याच्यामध्यें व येझो बेटामध्ये एक लहानशीच खाडी आहे, आणि तिचें पाणी हिवाळ्यांत गो-ठून जातें. संघालियन बेटाच्या दक्षिणेकडच्या भागांत ऐनो लोक आढळतात, व कुराईल बेटामध्ये ह्यांचाच भरणा विशेष आहे.

 चिनी लोकांप्रमाणे ऐनो हे मांगोलियन वर्गापैकी आहेत.तरी कांही गोष्टींत चिनी लोकांमध्यें व त्यांच्यामध्ये दिसावें तसें साम्य दिसत नाहीं. त्यांची चण लहान असते; खांदे रुंद असतात; व ते हाडापेरानें बळकट असतात. त्यांचे दंड व तंगड्या आंखूड असून लठ्ठ असतात, व पाय आणि हाताचे पंजे मोठे असतात. त्या लोकांची जगांतील अत्यंत केसाळ लोकांमध्ये गणना आहे. त्यांच्या दाढीचे केस रांठ व दाट असतात. त्यांच्या सर्वांगाधर केसांचे झुबकेच्या झुबके असतात. त्यांच्या भिवया जाडी व लांब असून सर्व कपा- ळभर पसरलेल्या असतात. ते आपल्या डोकीचे केस माने-पर्यंत लांब वाढवितात, व त्यांच्या दाढीच्या केसांत ते मिसळून गेल्याप्रमाणे दिसतात. त्यांच्या शरीराचें कातडें पिंगट वर्णाचं असतं.

 साधारणत: आपण असे पाहतों कीं, कोणत्याही जातींत पुरुषांपेक्षां स्त्रिया कोमल व सुखरूप असतात. परंतु ऐनो लोकांचें त्या नियमाच्या अगदी उलट आहे. त्यांच्यांतील बाय- कांना काम फार पडत असल्यामुळे त्या फार लवकर ह्यातं- ऱ्या दिसूं लागतात. तशांत नानाप्रकारची चित्रे आंगावर गोंदन घेऊन त्या आपले शरीर विदें करून घेतात.