पान:जपानचा इतिहास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें.

१९

_____
जपानामध्ये अति प्राचीन काळापासून राहणारे
ऐनो लोक.

 जपानचे मूळचे रहिवाशी कोण ते खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं. हिंदुस्थानांत व इतर देशांत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणें जपानांतही दगडी बाणांच्या अणकुच्या, दगडी कुन्हाडी व इतर दगडी शस्त्रे जमिनीत सांपडतात.पृथ्वीवर अफाट पसरलेल्या कोणत्या लोकांचीं व कोणत्या काळचीं ह्रीं आयुधें असावीत त्याविषयीं अजून वाद आहे.

 'जपानामध्ये ' ऐनो ' नांवाचे एक जातीचे लोक आहेत. अति प्राचीन काळापासून जपानामध्ये ह्याच लोकांची वस्ती आहे, असा शोध आहे. जपानच्या मुख्य भागांत येझो येथेंच ह्या लोकांची वस्ती ह्या काळी आहे. परंतु पूर्वकाळी हे लोक सर्वत्र पसरलेले होते. एस्किमो जातीचे लोक ज्याप्रमाणें त्याप्र- माणें ते लोक आपणास ऐनू ह्मणजे मनुष्य असें ह्मणवून घेतात. परंतु जपानी लोक तिरस्कारपूर्वक त्यांना असें ह्मण- तात कीं, तो शब्द इम् ह्यणजे कुत्रा ह्या शब्दापासून निघा - लेला आहे. एबिसु ह्मणजे रानटी हैं एक त्या लोकांना जपानी लोकांनी दिलेलें दुसरें नांव आहे.

 ज्याप्रमाणें हिंदुस्थानांत उत्तरेकडून येणाऱ्या आर्य लोकांनी हिंदुस्थानांतील मूळच्या लोकांना दक्षिणेकडे हटवीत आणिलें, त्याप्रमाणे नैर्ऋत्य दिशेकडून येणाऱ्या जपानी लोकांनी ऐनो लोकांना उत्तरेकडे व पूर्वेकडे रेटलें. तथापि दक्षिणेकडच्या बेटांतील कित्येक गांवांची अजून ऐनो लोकांनीं आपल्या भा षेंत ठेवलेली नांवेंच कायम आहेत.