पान:जपानचा इतिहास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ३ रें.

२१


त्या आपल्या तोंडावर ओठापासून मागें प्रत्येक कानापर्यंत एक निळा पट्टा गोंदून ठेवितात. ह्या योगाने त्यांचें तोंड ह्या कानापासून त्या कानापर्यंत फाटून गेलेले दिसतें. त्यांच्या हातावर चौकोन त्रिकोणादि नानाप्रकारच्या आकृति गोंदलेल्या असतात. लहानपणीं पांच वर्षीपासून तो कन होईपर्यंत निरनिराळ्या वेळी हा गोंदण्याचा समारंभ होत असतो. जपानी सरकारने कायद्याने ह्या गोंदण्याची बंदी केली होती; त्यावेळी सर्व ऐनो लोक मोठे हवालदील झाले होते. ते ह्मणाले कीं, गोंदणे हा आमचा धर्मविधि आहे, तो झाल्यावांचून आमच्या लोकांस लग्नकरितां येत नाहीं. आमच्या हिंदु लोकांतही गोंदण्याची चाल सक्तीनें अम- लांत आहे, व येथेही तिला धर्माचें स्वरूप प्राप्त झालें आहे. त्यावरून असा तर्क करण्यास जागा होते की, ही चाल आह्मी अनार्यांतपासून घेतली असावी. आतां ही चाल चांगली अथवा वाईट, ह्या गोष्टीचा वाद प्रस्तुत स्थळीं न 'करितां, येवढे ह्मणतां येईल कीं, ह्या चालीला जे धर्माचें स्वरूप प्राप्त झाले आहे, तें नाहींसे होऊन लग्न होण्यापूर्वी प्रत्येक मुलीच्या कपाळावर चंद्रमा गोंदलेला असलाच पाहिजे, ही जी सक्ती आहे, ती अवश्य कमी झाली पाहिजे.

 ऐनो लोक आपल्या मुलांवर फार प्रीति करितात, व ते त्यांचे हरएक प्रकारचे लाड पुरवितात. चार अथवा पांच वर्षांची तीं होईपर्यंत त्यांना नांव मिळत नाहीं. लहान- पणीं ह्यांचे आईबाप त्यांना आपल्या पाटकुळीवर बांधून हिंडवितात. आठ वर्षेपर्यंत ह्यांच्या आंगावर आगरखे वगैरे कांहीं घालीत नाहींत.