पान:जपानचा इतिहास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
जपानचा इतिहास.

 जपानामध्ये मोठमोठे सर्प आहेत, परंतु ते अगदीं निरु- पद्रवी आहेत, तेथे एक सपची लहान जात आहे, ती मात्र विषारी आहे. त्या जातीच्या सर्पांना ते लोक धरतात व शिज-चून खातात. त्यांची अशी समजूत आहे कीं, ते सर्प खाल्ल्याने पुष्कळ तऱ्हेचे रोग बरे होतात. जपानांमध्ये एक जातीचे सरड आहेत, त्या सरडांचेंही मांस ते लोक औषधी मानून भक्षण करितात.

 जपानांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे मत्स्य सांपडतात, मत्स्य हैंच त्या लोकांचें मुख्य भक्ष्य आहे. शार्क जातीच्या मोठ्यां माशापासून तो हलक्या प्रतीच्या मासोळ्यांपर्यंत सर्व प्रका- रच्या मत्स्यांचा ते लोक फडशा उडवितात.

 खेकडे विपुल आहेत, समुद्रांत एक प्रकारचा कोळी सांपडतो. त्याला जपानी लोक 'लंबपाद असें ह्मणतात, कारण त्यांपैकीं नराचे पाय पांच फूट लांब असतात. काल- वांचा उपयोग जपानी लोक अन्नाकडे करितात. चिनी लो- कांप्रमाणें जपानी लोकही सर्वभक्षक आहेत. ते समुद्रांतून निघणारा कोणताही प्राणी खावयाचा ठेवीत नाहींत.

 जपानांत रेशमी किड्यांची जतन फार करितात. जगा- मध्ये रेशीम उत्पन्न करणारे पहिल्या प्रतीचे जे कित्येक देश आहेत त्यामध्ये जपानची गणना होते.