पान:जपानचा इतिहास.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रे.

१७


प्रमार्णे एक जातीचीं जनावरें घरांतून वापरतात. तीं उंदरांचा फडशा पाडतात. तेथें रानडुकरांचा सुळसुळाट फार आहे. कित्येक प्रांतांमध्ये आपल्या पिकाची रानडुकरांनी येऊन ना- साडी करूं नये ह्मणून शेतकरी लोकांना आपल्या शेतांभों- वत आगट्या पेटवून रात्रीच्या रात्री जागून काढाव्या लागतात.

 पाळीव जनावरांपैकीं घोडे असतात ते खुजा जातीचे असतात. त्या देशांत् गाई आहेत, परंतु त्यांचा उपयोग दुधा- कडे करीत नसून ओझी वाहण्याकडे वगैरे करितात. हा एक त्या देशांत मोठाच चमत्कार ह्मणावयाचा. अमृतोपम जें गाईचे दूध त्याचा त्या लोकांना आस्वादसुद्धां ठाऊक नाहीं ! 'जपानांत कुत्री फार आहेत. कुत्र्यांना कोणी मारल्यास तो शिक्षेला पात्र होत असे. पूर्वी जपानामध्ये कुत्र्यां- ची इतकी बडेजाव असे कीं, तीं मेल्यानंतर त्यांना माणसाप्रमाणें सर्व विधी करून पुरण्यांत येत असे. गांवडुकरें व एका प्रकारची आंखूड शेपटीचीं मांजरें जपानामध्ये आहेत. गाढवें, शेळ्या,बकरी वगैरे जरा कमी आहेत. शेळ्या व मेंढ्या ह्यांची बाहेरून आणून त्या देशांत वाढ करण्याची खटपट चालली आहे, परंतु जपानांतील गवत त्यांना मानवत नाहीं. कोंबडी बदके व कबूतरें वगैरे दृष्टीस पडतात; परंतु राजहंस मुळींच नाहींत.

 पाकोळ्या, कावळे आणि घारी पुष्कळच आहेत. गाणारे पक्षी तेथें पुष्कळ कमी आहेत. सगळ्या पक्ष्यांत बगळ्याच्या चित्रांची जपानी लोकांना फार आवड आहे. पडद्यावर व भिंतीवर जेथें तेथें बगळ्यांची चित्रे विपुल काढलेली असतात.