पान:जपानचा इतिहास.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
जपानचा इतिहास.

 धान्यें, भाजीपाला, वगैरे- जपानचा आठवा हिस्साच काय तो लागवडीस आणलेला किंवा लागवडीस आणतां येण्याजोगा आहे. बाकी सात अष्टमांश प्रदेश निव्वळ पडीक आहे. तो सर्व प्रदेश डोंगराळ असून त्यावर कोठें हलक्या प्रतीचे गवत; कोठें कांटेरी झाडें व कोठें मोठमोठया वृक्षाची अरण्ये आहेत. तांदूळ, गहू व जवस हीं धान्यें वि- शेषेकरून जपानांत उत्पन्न होतात. घेवडा, वांगी, व मुळे अमूप आहेत.

 चीनमधून जपानामध्ये एका बुद्धधर्मी प्रवाशाने इ० स० ८०५ च्या सुमारास प्रथमतः जपानी लोकांत चहाचा प्रसार केला, असें ह्मणतात. बुद्धधर्मी लोकांना उपासनेकरितां रात्रीच्या रात्री जागून काढाव्या लागत. त्यावेळी त्यांना चहाची फार म- दत होत असे. त्यामुळे त्या लोकांत चहाचे प्रस्थ फार माजलें होतें. हा चहा जपानमध्ये ठिकठिकाणीं उत्पन्न होतो; व पर- देशास पुष्कळ रवाना होतो.

 आठव्या शतकांत जपानामध्ये जे कवि होऊन गेले, त्यांच्या कवितेंत नारिंगाच्या झाडाची लागवड जपानांत प्रथ- मतः झाल्याचा उल्लेख आहे. जपानामध्यें तमाखूचा प्रवेश इ० स० १६०० च्या सुमारास झाला असावा, व तो पोर्तुगीज लोकांनी केला असावा.

 जनावरें - ज्यांत वानरें आहेत असा अगदीं उत्तरेकडचा देश हाटला ह्मणजे जपानच होय. जपानांत अस्वलांचा भरणा विशेष आहे. वाघ, चित्ते, लांडगे वगैरे रानवट जनावरे तर जपानांत नाहींतच. परंतु जपानांत रानमांजरेंसुद्धां पहावयास मिळत नाहींत. कोल्हे मात्र पुष्कळ आहेत. मुंगसांच्या जाती