पान:जपानचा इतिहास.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रे.

१५


तेथील हवेंत बराच फेरफार होतो. तेथे उन्हाळ्यांत वाहणारा वारा दक्षिणेकडून येतो. व तो गरम असून बाष्पयुक्त असतो. पावसाळ्यामध्यें व हिंवाळ्यामध्ये वाहणारे वारे उत्तरेकडून व वायव्येकडून वाहतात व ते थंड असतात. मनुष्यांना त्राहि त्राहि करून सोडणारे उष्ण व वर्तुळाकार वारे ज्यांना शयफून हृाणतात, तेही केव्हां केव्हां जपानांत आपलें भयंकर स्वरूप प्रगट करितात.

 खनिज द्रव्यें-- जपान देशामध्ये सोनें, रुपें वगैरे मौल्य- वान् धातु फार कमी सांपडतात. ताबें व सुरम्याचा धातु हे दोन धातु जरा अधिक सांपडतात. परंतु लोखंड व दगडी कोळसे यांची समृद्धि जपानांत फार आहे. हे दोन जिन्नस दिसतांना काळे व आपल्याला हीन वाटतात योग्यता फार मोठी आहे. हे दोन खनिज खरे, परंतु त्यांची पदार्थ इंग्लंडांत आजपर्यंत जितके भरपूर सांपडत आले, तितके जर ते न सांपडते, तर आज इंग्लंड सुधारणेंत किती एक शतकें मागें राहिलें असतें. कारण ज्या कलाकौशल्याच्या व यंत्रसिद्ध का- रखान्यांचा जोरावर इंग्लंड आज ह्या किंमतीला पोंचलें आहे, त्या कलाकौशल्याचें व त्या कारखान्यांचें लोखंड व दगडी कोळसा हें जीवित होय. हेंच जीवित जपानला भरपूर मिळा- लेले आहे व त्याच्या जोरावर जपानचीही भरभराट आतां कशी होत आहे, ते दिसतेंच आहे. दगडी कोळसा ह्या देशां- तून चीन देशाला फार रवाना होतो. तेथेंही त्याच्या खाणी विपुल आहेत. तरी जपानी लोकांनी आपला दगडी कोळसा त्यांच्याही पेक्षां स्वस्त केला आहे.