पान:जपानचा इतिहास.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
जपानचा इतिहास.

ज्वालामुखी पर्वत व भूकंप ह्यांच्या योगानें जपानचें फार नुकसान झालें आहे खरें; तथापि ज्वालामुखीच्या योगानें व भूकंप झाले ह्मणूनच जपानचा पुष्कळ भाग वर आलेला आहे; नाहीं तर भाजकाल तो समुद्रांत बुडून गेलेला असता.

 इ० स० १८८० साली प्रोफेसर मिल्ने ह्या गृहस्थाच्या परिश्रमानें जपानांत एक सोसायटी स्थापन झाली आहे. त्या सोसायटीनें एक यंत्र शोधून काढलें आहे. त्या यंत्राच्या साहा य्यानें धक्के किती बसले व किती जोराचे बसले तें मोजतां येतें. त्या सोसायटीनें निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करून पाहिले आहेत व आतां पूर्वीच्या इतके धरणीकंपापासून नुक सान न होऊं देण्याची त्यांना तजवीज करितां येते.

 हवा - जपानदेश विस्तीर्ण वसलेला असल्यामुळे तेथे निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळ्या प्रकारची हवा असते. कुरा- ईल बेटे थंड आहेत; मध्यनपान समशीत आहे; लुचु बेटांची हवा ऊष्ण आहे. होंडो बेटाचा आग्नेयभाग, ज्याला लगटून कृष्णप्रवाह वहात आहे व ज्याच्यासमोर पासिफिक समुद्र आहे त्याची हवा सैबेरियाच्या तोंडाला व जपानसमुद्राला ला- गून असलेल्या भागापेक्षां बरीच सौम्य आहे. टोकियो प्रांता- ध्या महासागराकडच्या बाजूला थोडेंसें बर्फ पडते. तें बर्फ अल्पावकाशांत वितळूनही जातें. परंतु जपानी समुद्रालगतची जी शहरे आहेत त्या शहरांत बर्फाचा थर तीन तीन चार चार फूट सांचलेला असतो. हिवाळ्यामध्ये बहुतेक. सर्व ज- पानी पर्वत बर्फाने अगदी दाट आच्छादून गेलेले असतात. एखाद्या वर्षी कडक उन्हाळा पडला तरच त्यापैकी कित्येकां- वरील बर्फ सर्व वितळतें. निरनिराळ्या प्रकारच्या वान्यांनी