पान:जपानचा इतिहास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
जपानचा इतिहास.

नंतर धाडकन् खालीं पडलीं, व त्या खालीं असंख्य मनुष्यें दडपून गेली. असे एकामागून एक तीन मोठे धक्के बसल्या- नंतर जरा स्वस्थता झाली. ज्या वेळेला ते धक्के बसण्यास सुरु- वात झाली, त्या वेळीं जो तो रस्त्यावर धांव घेण्यास पाहूं लागला. कियोटो शहरांतील बहुतेक घरें जमीनदोस्त झाली. थोडीशी मोडतोड होऊन शाबूद राहिलेली घरें थोडीं; पूर्ण- . पण सुरक्षित असे एकही घर राहिलें नाहीं, नंतर धक्क्यांचा जोर बराच कमी झाला. परंतु धक्के एकसारखे नसत होतेच. त्या दिवशीं चोवीस तासांत निदान १२० धक्के बसले. ह्मणजे इतके धक्के स्पष्ट मोजतां येण्याइतके जोराचे होते. बाकी सूक्ष्म धक्के असंख्यात बसले असतील. एकंदरीत त्यादिवशीं त्या भूप्रदेशाला क्षणमात्र स्थिरता नव्हती असें ह्यटलें पाहिजे. लोक हवालदील झाले. तशांत दंव व पाऊस ह्यांचा त्यांजवर मारा सुरू झाला, तेव्हां तशांत जमिनीवर गवत पसरून त्यांज- वर ते अंगाखालीं व वर सतरंज्या आणि आंगरखे घेऊन निजले. पुष्कळांनी जाऊन पर्वताचा आश्रय धरिला. पुढें सरासरी दररोज वीस ह्याप्रमाणें धक्के बसत होते. पूर्णपण धक्के बंद होण्यास एक महिना लागला.

 अगदी अलीकडला मोठा असा धरणीकंप टोकियो राज- धानीत इ. स. १८५५ साली झाला. त्यावेळी एका महिन्यांत भूकंपाचे ८० धक्के बसले. त्यांपैकी सर्वांत दांडगा धक्का ता० १० नव्हेंबर रोजी रात्री बसला. शहरांतील घरें, देवळे वगैरे सर्व एकाएकीं पडून शहर हाणजे नाना- प्रकारचे मोडके तोडके पदार्थ सांठविलेला एक उकीर- डाच बनला. इतक्यांत निरनिराळ्या तीस ठिकाणी एकाएकी