पान:जपानचा इतिहास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ .

११


झाली तर एकाएकीं त्या भांड्यांतलें पाणी उतूं येऊन बाहेर वाहूं लागतें; हें ज्या नियमांनीं होतें, त्याच नियमाने पृथ्वीच्या पोटांतील प्रवाही बनलेले खडक वाट सांपडेल तेथून अगर वाट न सांपडल्यास आपल्यापुढील पदार्थ दूर करून बाहेर येतात, व त्या ठिकाणीं ज्वालामुखी बनतात, चुलीवर ठेवलेल्या भांड्यांवर जर झांकण ठेवलें असेल तर आंतील पाण्याच्या वाफेच्या जोरानें कित्येक वेळां तें झांकण उडूं लागतें. त्याचप्रमाणें पृथ्वीच्या पोटांत असलेल्या उष्णतेच्या जोरानें कित्येक वेळां भूपृष्ठ कंपित होतो. जपानामध्ये एखादा ज्वालामुखी पर्वत पेटला ह्मणजे बहुतकरून त्यामागून थोड- क्याच अवकाशांत एखादा भयंकर भूकंप होतोच.

 अशा पुष्कळ भूकंपांच्या हकीगती आपणास ऐकाच - यास व वाचावयास मिळतात. इ. स. ६८५ साली एक भूकंप झाला. त्यायोगें पर्वत कोसळून पडले, नद्यांची पात्रें एकाएकीं वर उचललीं गेल्यामुळे त्यांचें पाणी सभोवार चोहों- कडे पसरलें, देवळ वगैरे इमारती घडावड खालीं पडल्या. हजारों मनुष्यें व जनावरें एकाएकी मृत्युमुखी पडलीं, आणि एक भला थोरला भूप्रदेश एकाएकीं खाली जाऊन त्यावर समुद्राचें पाणी खेळूं लागलें. अलीकडे जे भूकंप झाले त्यांपैकी दोहोंचें वर्णन एका प्रवाशानें खाली लिहिल्याप्रमाणें केलें आहे. जपानची दक्षिणेकडची राजधानी कियोटो येथें इ. स. १८३० च्या आगष्ट महिन्यांत एक भूकंप झाला. पहिल्या प्रथम मेघगर्जनेप्रमाणे एक जंगी गर्जना झाली. नंतर समु द्राच्या लाटाप्रमाणें घरें डळमळ डळमळ करूं लागलीं, आणि