पान:जपानचा इतिहास.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
जपानचा इतिहास.

 ज्याप्रमाणें धरणीकंपाविषयींची आमची पौराणिक सम- जूत केवळ कल्पनाच आहे, त्याचप्रमाणे जपानी लोकांची अशी समजूत होती की, पृथ्वीच्या खालीं एक थोरला मत्स्य आहे व तो मस्त्य जागा झाला ह्मणजे आपले अंग हाल- वितो व त्या योगानें पृथ्वीला धक्के बसतात, कोणाच्याही राष्ट्रा- च्या बाल्यावस्थेत त्यानें आपल्या दृष्टीस पडणाऱ्या अनेक सृष्ट चमत्कारांचें कोर्डे आपल्या केवळ कल्पनेच्या जोरावर पाहिजे त्या रीतीनें व फार श्रम न घेतां सोडविण्याचा प्रयत्न करावा, हें साहजिकच आहे; व त्याप्रमाणे चोहोंकडे होत आलेलेंही आहे. एक जगदुत्पत्तीचेच उदाहरण ध्याना ? ह्या विषय नाना धर्मांच्या व नाना राष्ट्रांच्या लोकांनी नाना प्रकारच्या कल्पना बसविल्या आहेत. परंतु त्या केवळ पौराणिक (जुन्या काळच्या लोकांच्या - अर्थात् जगाच्या बाल्या- वस्थेंतील ) कल्पना आहेत. शास्त्राच्या कसोटीला जर त्या लावून पाहिल्या तर त्या कुचकामाच्या ठरतील ह्मणून ह्या सुधारलेल्या शतकांत शास्त्रीय लोकांनी ह्या भूकंपाविषयीं कोणतें मत सिद्ध केलें आहे तें पाहूं.

 ज्वालामुखींतून निघणाऱ्या अग्नीच्या आलांवरून व उष्ण झन्यांतून निघणान्या पाण्याच्या वाफेवरून आपणास असें दिसून येतें कीं, पृथ्वीच्या पोटांत नानातऱ्हेचे खडक वितळून जाण्याइतकी उष्णता आहे. ही गोष्ट कळून आल्या- नंतर धरणीकंप का होतात व ज्वालामुखी कसे उत्पन्न होतात, त्याची कारणे समजण्यास फारसे अवघड जाणार नाहीं. चुलीवर एखाद्या भांड्यांत कांहीं पदार्थ शिजत ठेवलेला असावा. त्याखालीं जर विस्तवाची आंच जास्त