पान:जपानचा इतिहास.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रें.


स्फोटानें फूजीजवळ राहणारे लोक आपल्या घरादारांला आंचवले, व कित्येक भुकेमुळे प्राणास मुकले. त्या पर्वतासभोंवार जीं असंख्य खेडीं होतीं त्यांपैकी एकही नांवाला उरलें नाहीं. "

 १८७४ सालीं येझो बेटांतील टामुराई पर्वताचा अक- स्मात् स्फोट झाला, त्यांतून निघालेली रक्षा समुद्रकांठाला जाऊन पडली होती.

 उष्ण झरे - जपानाइतके उष्ण पाण्याचे झरे प्राय: पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्याही देशांत नसतील. सर्व जपान देशभर जिकडे पाहावे तिकडे उष्ण झरे आहेतच. सामा- न्यतः त्यांचें पाणी फारच उष्ण असतें. कित्येक झऱ्यांतून निघणारे पाणी तर एकसारखें उकळत असतें. असले उक- ळणाऱ्या पाण्याचे झरे बहुशः ज्यांतील स्फोट नुकताच बंद झाला आहे, अशा ज्वालामुखीच्या पायथ्याशी असतात. त्यां- तून एकसारखा सूं सूं आवाज व त्या आवाजाबरोबर गंधक- मिश्र वाफ निघत असते. त्या देशांत सांपडणाऱ्या गंधकांपैकी बहुतेक भाग ह्या गंधक मिश्र वाफेपासून उत्पन्न झालेला असतो. ज्या लोकांना त्वगूरोग किंवा दुसरा तसल्याच प्रकारचा एखादा रोग झाला असेल ते ह्या गंधकोदकांत स्नान करून घेतात. त्यायोगें त्यांच्या रोगाचा बराच परिहार होतो.

 भूकंप -- आंकडेशास्त्रज्ञांनी असा अंदाज केला आहे कीं, जपानांत दरसाल सरासरी पांचरों धरणीकंप होतात. सामान्यत्वें करून त्यांचे धक्के फार सूक्ष्म असतात. इतके कीं, केक प्रसंगी धक्का बसला न बसला तो समजतसुद्धां नाहीं. परंतु ज्याच्या योगानें फार प्राणहानी व वित्तनाश होतो असा एखादा भूकंपाचा धक्का दर वीस वर्षातून एकदा तरी बसतोच,