पान:जपानचा इतिहास.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जपानचा इतिहास.

नानाप्रकारच्या खनिजपदार्थांच्या रसाचे लोटच्या लोट बाहेर सूं सूं करीत निघतात, व ते दूरवर जाऊन पडतात. कियु- शिबेटांमध्ये असामयामा नांवाचा ज्वालामुखी आहे. ह्याच्या तोंडाचा विस्तार पृथ्वीवरील इतर कोणत्याही ज्वाला- मुखीच्या तोंडापेक्षां अधिक आहे. त्यांतून जी राख बाहेर पडते ती इतक्या जोरानें निघते कीं, सभोंवार कित्येक मैल दूरवर ती जाऊन पडते.

 ह्या ज्वालायुक्त पर्वतांच्या पायीं जपानामध्यें जे एकेक अनर्थपात झाले ते त्यांच्या इतिहासांत लिहिलेले आहेत. ते वाचले ह्मणजे अंगावर शहारे येतात. मागें ज्या फूजियामा पर्वताविषयीं लिहिलें आहे, त्या पर्वताचा शेवटचा स्फोट इ. १७०७ ह्या वर्षी झाला, त्या वेळीं त्या पर्वताच्या पूर्वेकडील पायथ्यापासून नऊ मैलाच्या अंतरावर एका देवळांत राहणा- ज्या वैराग्याने त्या स्फोटाची हकीगत सांगितली ती अशी:-

 " ह्या पर्वतावर पूर्वी कित्येक वर्षे स्फोट झालेला नव्हता. त्यामुळे त्याजवर मोठमोठे वृक्ष वाढले होते व तो पर्वत हिरवा गार दिसत असे. परंतु त्या दिवशीं एकाएकीं व अकस्मात् त्या पर्वताचें तोंड उघडलें. त्यांतून जी रक्षा बाहेर पडली, ती वर आकाशांत उडाल्यामुळे सूर्यरश्मींचा लोप होऊन दिवस असतां त्याला रात्रीचें स्वरूप आलें. तांबडे लाल दगड हवेतून सूं सूं करीत दूर जाऊन पडले, शेत, बागा, घरेदारें, देवळें वगैरे सर्व कांही त्या डोंगरांतून बाहेर पड- लेल्या पदार्थांनीं बजून गेलें. त्या पर्वताच्या स्फोटाचा आवाज साठ मैल लांबपर्यंत ऐकूं जात होता. व त्यांतून निघालेला राखवडा पासिफिक महासागराच्या तीराला जाऊन पडला. हा