पान:जपानचा इतिहास.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
जपानचा इतिहास.

परद्वीपाला जाऊं लागले-तेव्हांपासून जपानी सुधारणेला आरंभ झाला. त्या लोकांप्रमाणें आमचे लोक परद्वीपाला नाऊन आल्याविना पाश्चात्य सुधारणेचे रहस्य त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाला यावयाचें नाही. परदेशांतील सुधारणेच्या संस्था पाहून त्या संस्थांप्रमाणे आपल्यामध्ये सुधारणेच्या संस्था अस- ल्याविना, आपली उन्नति व्हावयाची नाहीं, अरों जपानी लोकांना वाटू लागलें. ही गोष्ट त्यांनी शोगुनला कळविली. शोगुनका' ती मान्य करणे भाग पडलें. मिकाडोच्या हातीं राज्यसूत्रे आली. मिकाडोनें आ- पले लोक विद्या व कलाकौशल्य शिकण्याकरितां पर- द्वीपाला पाठविले व परद्वीपाचे लोक आणून आपल्या देशांत शिकविण्याकरितां ठेवले. आमचें स्वराज्य असतें, तर ही गोष्ट येथेही घडून येण्यास कांहीं नड पडली नसती. इंग्रज लोक आता आह्माला शिक्षण देतात खरें, परंतु ते त्यांची गरज भागण्यापुरतें व एकदेशीय देतात. आमच्या उन्नती- करितां जर त्यांना शिक्षण द्यावयाचें असतें, तर त्यांनी पर- देशांतून शिकून आलेल्या लोकांस व देशांतच शिकलेल्या लोकांस धंदे व कारखाने काढण्यास उत्तेजन दिलें असतें, आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणें त्यांस मोठमोठ्या जागा देऊन त्यांच्या आंगीं कर्तृत्वशक्ति आणली असती. आधी आमचे लोक धंदे शिकून येण्याला परदेशांत फारसे जात नाहींत. जे थोडे जाऊन येतात, त्यांस सरकाराकडून, संस्थानिकां- कडून अगर लोकांकडून मिळावे तसें उत्तेजन मिळत नाहीं. आमच्या निरनिराळ्या संस्थानिकांनी जपानी सरकारचा हा मंत्र आधी शिकावा. जपानी लोक सर्व प्रकारच्या पाश्चात्य