पान:जपानचा इतिहास.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २३ वे.

१३१


विद्यांमध्ये व कळांमध्ये तरबेज झाले, झणूनच त्यांचे आज एवढें राजकीय महत्व वाढलें आहे. तें वाढण्यास जपानी लोकांपेक्षां जपानी सरकार विशेष कारणीभूत झालें आहे ही गोष्ट खरी, तरी पण जपानी जहागीरदारांनींही त्यांस चा- गली मदत केली आहे. व लोकांनीही आपली उन्नति करून घेण्याची आपली तयारी दाखविली, हे विसरता कामा नये. स्वसुधारणेकरितां जपानी जहागीरदारांनी आपल्या जहागिरी व चाकरमाणसें मिकाडोच्या हवाली केली, ही गोष्ट जपानी इतिहासांत किंबहुना जगाच्या इतिहासांत महत्वाची आहे; व आमच्या देशांतील कोरड्या देशाभिमानाच्या गोष्टी सांग- •णारांनी ती अवश्य लक्षांत बाळगावी. असो. जें जपानी सरकारनें केलें तें आमच्या देशांतील पुष्कळ संस्थानिकांना व राजे रजवाड्यांना करितां येईल. पण जपानी सरकाराने . केलेल्या पुष्कळ गोष्टी आज आमच्यांतील देशाभिमानी पुढारी लोकांनाच कराव्या लागतील. कारण कीं, सरकार परकी, व संस्थानिक अज्ञ व सार्वभौम सत्तेला आज्ञांकित अशी स्थिति असल्यामुळे जे जाणते चार पुढारी आहेत, त्यांनींच आपल्या अज्ञान देशबांधवांना उद्योगाच्या ह्या सुधारणेच्या 'शतकांतील दिशेचें वळण लावून दिलें पाहिजे.


समाप्त.