पान:जपानचा इतिहास.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २३ वै.

१२९


प्रकरण २३ वें.
जपानी लोकांपासून घेण्याचा बोध.

 आजकाल जपान देश मोठमोठ्या यूरोपियन राष्ट्रांच्या जवळ जवळ बरोबरीचा होऊन बसला आहे. ही येवढी योग्यता त्याला तीस वर्षांपूर्वी कांहीं नव्हती. आज तीस वर्षांत त्या राष्ट्राची येवढी योग्यता वाढण्यास या राष्ट्रानें केलें तरी काय ? असा प्रश्न साहजिक उत्पन्न होतो. पूर्वीच्या काळी असे एखादें राष्ट्र जर एकाएकी महत्वास चढलें असतें; व त्या वेळीं जर हा प्रश्न विचारला असता, तर 6 त्या राष्ट्रानें मोठें शौर्य गाजविलें, ' असे उत्तर आले असतें व र्ते शोभलेंही असतें. हल्लींच्या काळी जपाननें विनाशी लढाई करून मोठें शौर्य प्रकट केलें खरें, परन्तु त्याची योग्यता वाढण्यास तें शौर्य कांहीं कारण झालेलें नाहीं. योग्यता वाढल्यामुळे घडून आलेलें तें कार्य आहे. जपानची योग्यता येवढी वाढण्यास एक फक्त 'शिक्षण कारणीभूत झालें आहे. हे शिक्षण मिळविण्याच्या पाय अनेक लोकांनी अनेक प्रकारची झीज सोसली आहे.

 जपानी सुधारणेला आरंभ कोठून झाला तो पहा ! जोपर्यंत ' परद्वीपस्थांनी जपानांत येऊं नये व जपान्यांनी परद्वीपाला जाऊं नये,' अशी सक्त बंदी होती, तोपर्यंत जपानी लोक अज्ञानांधकारामध्ये लोळत पडले होते. पर- द्वीपस्थ व्यापारी जपानांत येऊन राहू लागळे व जपानी ढोक परद्वीपाला जाऊं लागले ध्यानांत ठेवा ! जपानी लोक