पान:जपानचा इतिहास.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
जपानचा इतिहास.

मिळून एखाद्या लहानशा खेड्या एवढा विस्तार होईल. संपूर्ण जपानांत हेंच देऊळ मोठें. कियाटो येथें अन्नपूर्णा देवीचें एक देवालय टेकडीच्या पायथ्याला आहे.त्या टेकाडावर पुष्कळ रानटी कोल्हे अद्याप पावतों आहेत.हीं जनावरें त्या देवीला प्रिय आहेत. वर्षांतून एकवार ह्या देवीचा रथ निघत असतो.

 कियाटो येथे रेशमी व कलाबतूचें काम उत्तम होतें, अशी आख्या आहे. येथील लोकसंख्या २,७६,००० आहे.

 ओसाका -हें मोठें व्यापाराचे ठाणें आहे. येथील लोकवस्ती टोकियोच्या खालोखाल आहे. हें कियोटोच्या बैर्ऋत्य दिशेस नदीच्या मुखाजवळ वसले आहे. येथें पुष्कळ कालवे आहेत. येथील भक्कम दगडी किल्ला जपानी इतिहा- सांत प्रसिद्धीस आलेला आहे. येथे सरकारी टांकसाळ आहे. at इंग्रज कामगारांच्या देखरेखीखाली १८६२त सुरू झाली आहे. परंतु आतां तिची एकून एक व्यवस्था जपानी लोकच पाहतात.

 ओसाका बंदरांतील समुद्राचें पाणी उथळ असल्यामुळे मोठमोठी गलबत तेथे नेण्यास मोठी अडचण पडते. झणून अलीकडे भोसाका येथील बहुतेक व्यापार ' कोब ' नांवा- च्या बंदराकडे जाऊं लागला आहे,

 नागासाकी - हे दक्षिणेकडे कियुशियु बेटांत आहे. एका लांब व अरुंद उपसागराच्या टोकाला हैं वसले असल्यामुळें गलबतें उतरण्यास है खासें बंदर झाले आहे. ह्याच्या तिन्हीं बाजूला डोंगर आहेत. चौथ्या बाजूला पेपनवर्ग नांवाचें एक लहानसे बेट आहे.

 ह्याप्रमाणे जपानांतील मुख्य मुख्य शहरांची हकीकत आहे.

_______