पान:जपानचा इतिहास.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २२ वै.

१२७


सलामीच्या तोफांच्या अवाजावरून जपानी लोकांनी ह्या गलबतांचें नांव बमबम गलबतें असें ठेवलें आहे.

 किचाटो - ह्मणजे राजधानी; हैं शहर टोकियोच्या नैऋत्य दिशेला सुमारे ३३० मैलाच्या अंतरावर आहे. त्या दोन शहरामध्ये आगगाडी चालू आहे. हें शहर सपाट मैदानावर वसले असून चोहोबाजूनें डोंगरानें वेष्टित आहे. इ. स. ७९४ ह्यावर्षी एका मिकाडोनें प्रथमत:ही आपली राजधानी बनविली. तेव्हांपासून बहुतेक मिकाडो ह्याच शहरों रहात आले. पूर्वी सांगितल्याप्रमाणें १८६८ सालापासून मात्र मिकाडो येडो उर्फ टोकियो येथे राहतो.

 कियाटो शहरांतील रस्ते विशेष रुंद नाहींत खरे, परंतु जपान देशांतील इतर कोणत्याही शहरांतील रस्त्या- पेक्षां ते विशेष सरळ आहेत. चार रस्ते मिळून जेथें जेथें चौक झाले आहेत, तेथें तेथें ते थेट काटकोनांत आहेत. 'शांतिभुवन' नांवाचा मिकाडोचा वाडा शहरच्या इशान्य भागाला आहे. पूर्वी कोणा परकी मनुष्याला हा वाडा पहावयाला मिळण्याची मुष्कील असे. परंतु आतां कोणीही जाऊन खुशाल पाहून यावे. हा लांकडी असून त्याच्या छपराला झाडाच्या साली घातल्या आहेत, त्या वाड्यांतील चटया, सतरंज्या व उघडतां झा- कतां येण्यासारख्या लाकडाच्या भिंती पाहण्यासारख्या आहेत. ह्या शहरीं निगो नांवाचा एक किल्ला आहे. हा किल्ला इयेथिसूनें शोगुनचा कियाटो येथील राहण्याचा वाडा ह्मणून बांधला आहे.

 कियाटो येथें पुष्कळ देवालयें आहेत. त्यांतील एका देवळांतील घाट १८ फूट उंच आहे. येथेच शिनशियु पंथाच्या बौद्ध लोकांचें एक देऊळ व एक विहारही आहे. हीं दोन्हीं