पान:जपानचा इतिहास.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
जपानचा इतिहास.

शहरांतील मुख्य रस्त्याचें नांव गिझा असें आहे. तेथील घरें विटांची असून त्याजवरील छपरें कौलांची असतात. तेथें मोठमोठी प्रसिद्ध दुकानें आहेत. शहरांतील बहुतेक व्यापार ह्याच ठि- काणीं चालतो. शहरांतील रस्त्यांतून ट्राम गाड्या चालू आहेत.

 शहरच्या दक्षिणेला शीबा नांवाचें एक उद्यान आहे, त्यांत आजपर्यंत झालेल्या बहुतेक शोगुनांची प्रेतें पुरलीं आहेत. तीं थडगीं साधींच आहेत, परंतु त्या थडग्यांशेजारींच देवळें बांधली आहेत, तीं मात्र शोभायमान आहेत. त्यांच्या समोरच्या भागाला एक लहानशी इमारत आहे. त्यांत राज्यकर्ता शोगुन प्रत्यहीं प्रार्थना करून जात असे.

 शहरच्या उत्तरेला दुसरें एक उद्यान आहे. त्यांत बाकी- घ्या कांहीं शोगुनांची प्रेतें पुरली आहेत. ह्यांतच विश्वविद्या- लय, पदार्थसंग्रहालय, पुस्तकालय वगैरे इमारती व वन- स्पतिशास्त्राच्या अभ्यासाकरितां बाग आहे. इतरही पुष्कळ पहाण्यासारख्या गोष्टी आहेत. शहरांतील घरें पूर्वीचीं आहेत ती लाकडांची असून गिड्डी असतात. परंतु आतां पुष्कळ सुधारणा होत आहेत. कौलांची छपरें व विटांचीं घरें आतां बरीच दिसून येतात.

 याकोहामा - हें बंदर टोकियोपासून १८ मैलांच्या अंतरा - वर आहे. १८५७ साली जेव्हां तेथे परदेशच्या व्यापाराला सुरवात झाली, तेव्हां तें एक अगदी लहानसें खेडें होतें. आतां तेथे ६५ हजारांवर लोकवस्ती आहे. ह्याठिकाणी टपालच्या आगबोटी, लढाऊ गलबतें व व्यापाराचीं जहाजें एकसारखी येत जात असतात. लढाऊ गलबतावर नेहमी होणाऱ्या