पान:जपानचा इतिहास.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २२ वे.

१२५


कडची राजधानी- असें नांव पडलें. व त्या पूर्वीची जी कियाटो राजधानी त्यास 'साय कियो ' ह्म० पश्चिमक ढची राजधानी - असें ह्मणूं लागले.

 टोकियो नांवाच्या उपसागराच्या तोंडालाच टोकियो शहर वसले आहे. त्या शहरच्या ज्या कांहीं भागावर आज " मोठमोठ्या इमारती दिसतात, तो भाग पूर्वी समुद्रांत बुडा- लेला होता. टोकियो शहरांतील इमारती आजपर्यंत बहुतेक लांकडाच्याच बांधीत आल्यामुळे, तें शहर अनेक वेळा जळालें आहे, व अनेक वेळां फिरून बांधलें गेलें आहे. 'अग्नि हैं येडो शहरचें भूषण आहे. ' अशी ह्मणच पडून गेली आहे. शहरची वस्ती फार विरळ आहे, त्यामुळें शहरचा विस्तार १० चौरस मैल झाला आहे. शहरच्या मुख्य भागामध्ये ९ लाख वस्ती आहे. व उपनगरांत ह्मणजे शहरांखाली असणाऱ्या वाड्या खेड्यांत १० लाख आहे. जिब्राल्टर व हैं शहर जवळ जवळ एका अक्षांशावर आहे, झणजे टोकियो हैं शहर जिब्राल्टरच्या थेट पूर्वेला आहे.

 मिकाडोचा राजवाडा शहराच्या मध्यभागी आहे. त्या भोंवतीं तीन तट व तीन खंदक आहेत. अगदीं आंतल्या भागांत मिकाडोचा वाडा व बागा आहेत. ज्यावेळेला त्या वाड्यात शोगुन रहात होता, त्यावेळी वर्षांतून सहा महिने सर्व दायमियो आंतल्या तटाच्या बाहेर व बाहेरच्या दोन तटाच्या आं- सच्या भागांत रहात असत. ते तेथे राहण्याचें बंद झाल्यापासून त्या ठिकाणी आतां सरकारी ऑफिसें व कोर्ट वगैरे भरतात.

 वाड्याच्या मध्यभागी निहोन्बाशी हाणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणापासून मैल बगैर अंतरें मोजतात. टोकियो