पान:जपानचा इतिहास.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४
जपानचा इतिहास.

थोडासा वेळ लोटला नाहीं तों, वारा त्यांचा मागमूसही नाहींसा करून टाकतो.

________
प्रकरण २२ वें.
जपानांतील मुख्य शहरें.

 जपानी लोकांची कमीत कमी साठ राजधानीची शहरें झाली आहेत ह्मणतात. प्राचीन काळी अशी चाल असे कीं एकादा मिकाडो एकाद्या राजधानींत मेला, की दुसन्या त्याच्या गादीवर बसणाऱ्या मिकाडोनें ती राजधानी सोडून दुसरें राजधानीचे शहर करावयाचें. जीं शहरे एकदा भरभराटीस आली होतीं, तीं आतां पुष्कळ नामशेष झाली आहेत.

 पुढें पुढे जसजशी सुधारणा वाढत चालली, तसतसे मिकाडो एकाच शहरांत राहू लागले. इ. स. ७०९ पासून ७८४ पर्यंत सात मिकाडांनी राज्य केलें. त्या सर्वांची राज- धानी 'नर' हेच शहर होते. त्यानंतर कियाटो व नंतर टोकियो ह्रीं शहरे अनुक्रमें राजधानीची झाली.

 येड्डो उर्फ टोकियो — पूर्वी पूर्व समुद्राच्या किनाऱ्याला येड्डो नांवाचें एक लहानसें खेडें होतें, तेथें फक्त मासे घर- णाऱ्या कोळी लोकांची वस्ती असे. त्या ठिकाणी एका योद्वयानें १४१६ त एक किल्ला बांधला. पुढे १६०३ मध्ये इयेथिसु हा जेव्हां शोगुन झाला. तेव्हां लढाईच्या सोईचें असें हें ठिकाण पाहून, त्यानें तेथेंच आपलें राहणें केलें. शोगुनची सत्ता लयाला गेल्यानंतर १८६८ साली मिकाडो येड्डो येथें येऊन राहिला व तेव्हांपासून येड्डोला ' टोकियो ' - झ. पूर्के-