पान:जपानचा इतिहास.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २रें.


ह्मणतात. ते लोक ह्या पर्वताची चित्रे काढितात. आमच्या देशांत हिमालयांतील स्थाने ज्याप्रमाणें आह्मी पवित्र मानतों, त्याप्रमाणे जपानी लोक त्या पर्वतांतील स्थाने पवित्र मानतात.

 जपानची रुंदी कमी असल्यामुळे तेथें मोठमोठ्या नद्या नाहींत. मोठी नदी हाटली ह्मणजे आमच्या देशांतील मोठ्या- शा ओढ्यापेक्षा फार तर जराशी मोठी असते. व उथळ अशा पात्रांतून संथपणे वहात ती समुद्रास जाऊन मिळते. परंतु पावसाळ्यांतील दिवसांमध्ये एकादे वेळीं जर कां अतिवृष्टि झाली तर तें पात्र कित्येक मैलच्या मैल फै- लावर्ते व अनेक वस्तूंना अचानक उचलून समुद्रांत ने- ऊन पोचविते. नद्याचे पूर हें एक त्या राष्ट्राला अरिष्टच वाटत असतें.

 जपानांमध्ये सर्वात मोठें बीबा नांवाचें एक सरोवर आहे.त्याची लांबी सुमारे ३६ मैल आहे. त्या सरोवराच्या आजू- बाजूच्या भागाचें सृष्टिसौंदर्य कांहीं अनुपम आहे असें ह्मणतात.

 ज्वालामुखी पर्वत – अमक्या ठिकाणीं ज्वालामुखीचा केव्हांना केव्हां तरी स्फोट झाल्याची चिन्हें नाहींत असा भूप्रदेश संपूर्ण जपानांत सांपडणे कठीण, त्या देशांत अस- णाऱ्या बहुतेक पर्वतांच्या शिखरांस भूम्यंतर्भागांतून वितळून वर आलेल्या खडकांचे लेप बसलेले आहेत. विझून थंड झालेले • ज्वालामुखी आज जपानांत कमीतकमी शंभर तर आहेतच. परंतु ज्यांतून दैदीप्यमान अशी वाफ सतत निघत आहे, असे ज्वालामुखी विसांहून कांहीं कमी नाहीत. समुद्रांतून पर्यटण करणाऱ्या लोकांना ह्या ज्वालामुखींचा अंधारामध्यें दिव्यां-. सारखा उपयोग होतो. ह्या ज्वालामुखींतून वारंवार राखेचे व