पान:जपानचा इतिहास.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २१ वे.

१२३


झाली. परंतु १८६८ सालच्या राज्यक्रांतीच्या वेळी सर्व गोष्टी पाटल्या व कान्फ्युशिअस पंथ आतां कोठें सांदी कोपऱ्यांत पडला आहे न कळे !

 मृतांच्या स्मरणार्थ उत्सव — जपानी लोक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ वर्षांतून एकवार मोठा उत्सव करितात. दक्षिणेकडील बंदर नागासाकी येथे तो उत्सव पुढे लिहि- ल्याप्रमाणे होत असतो.

 उत्सवाच्या पहिल्या दिवशीं रात्रीं फक्त आदल्या वर्षीच जे मेले असतील त्यांच्याच 'थडग्यावर रंगी बेरंगी कागदी कंदील लावतात. दुसन्या दिवशी रात्रीं सर्व थडग्यावर कंदील लावतात. त्या रात्रीं गांवांतील सर्व लोक स्मशानांत येतात, व आपल्या पूर्वजांच्या नांवानें यथेच्छ साकी नांवाचे मद्य पितात. त्या दिवशीं दारूकाम सोडतात. त्यांत औट विशेष असतात. तो आवाज व त्या लोकांचा हंसण्याखिद- ळण्याचा आवाज मिळून जो गोंगाट होतो, तो लांबवर ऐकू जातो.

 तिसऱ्या दिवशी रात्री सुमारें बारावर दोन वाजतां त्या थडग्यांच्या टेकाडांवरून लखलखीत कंदिलांचे थवेच्या थवे खालीं येत असलेले दृष्टोत्पत्तीस येतात. नंतर ते समु- द्राच्या किनाऱ्यावर एकवटतात. दिवस उगवण्यापूर्वी मृत लोक जहाजांत बसून कूच करितात, अशी त्यांची समजूत आहे. त्याकरितां जिवंत लोक गवताचीं लहान लहान जहाजें करून व त्यांना जिवापाड शिडें लावून त्यांत कंदील व कांहीं फलसामुग्री व थोडेबहुत द्रव्यही त्यांत घालून तीं जहाजें दिवस उगवण्यापूर्वी समुद्रांत सोडून देतात;