पान:जपानचा इतिहास.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
जपानचा इतिहास.

 १८६८ सालीं राज्यक्रांति झाली, त्या वेळीं बौद्धधर्म मागे पडून शिंटोधर्म पुढे येण्याची चिन्हें दिसूं लागलीं होती. शिटोधर्म हाच राजधर्म असें सरकाराने जाहीर केलें. त्याबरोबर पुष्कळ बौद्ध देवलयांतील बुद्धाच्या मूर्ति जाऊन त्या ठिकाणी आरसे व कागद चिकटविलेल्या काठ्या दिसूं लागल्या. परन्तु ही लहर फार दिवस टिकली नाहीं. बौद्ध धर्म स्वभावतः श्रेष्टच असल्यामुळे पुन्हा लवकरच त्याचा पगडा बसला. तथापि अजूनही शिटेोधर्माला सरकारांतून बरेंच उत्तेजन आहे.

 कान्फ्युशिअस पंथ - चिनामध्ये कान्फ्युशिअस नांवा- वा एक तत्ववेत्ता ख्रि. श. पूर्वी सुमारे साडेपाचशे वर्षांच्या सुमारास होऊन गेला. त्याचे असे मत आहे की, ' आईबापांची च राज्यकर्त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणें, ' हेंच काय तें जगांत येऊन एक इतिकर्तव्य.. परमेश्वराची भक्ति व उपा- सना करणें, हैं तो निरर्थक मानीत असे. ह्याच्या मतांचा प्रवेश जपानामध्ये खित्ति शकाच्या आरंभी लवकरच झाला खरा, परंतु १७ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्माचाच त्या देशांत विशेष अम्मल होता. सतराव्या शतकांत इये यिसू हाणून मोठा शोगुन होऊन गेला, त्यानें कान्फ्युशियस पंथाचीं पुस्तकें जपानांमध्ये छापून प्रसिद्ध केली. त्यानंतर सुमारें २॥ शें वर्षे जपानी मोठमोठ्या लोकांचीं मनें बहुतेक कान्फ्यु -- शियसच्या तत्वाच्या कलाचीं होतीं. इतर गोष्टींचा कांहीं विचार न करितां, निमूटपणे आईबापांची व राज्यकर्त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणे ह्या समजुतीमुळे जहागीरदार लो- कांवर आजपर्यंत राज्यकर्त्यांचा दाब राहण्यास चांगली मदत