पान:जपानचा इतिहास.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २१ वें.

१२१


 टोकियो येथील देवालयांत एक पुस्तकालय आहे. हें पुस्तकालय फिरते आहे. ह्मणजे कुंभाराचें चाक ज्याप्रमाणे फिरतें त्याप्रमाणें हें पुस्तकालय आपल्या आंसाभोवती फिरतें. ह्या ग्रंथकपाटाच्या उपयोगाबद्दल त्याच्यावर चिट्टी मारली आहे, ती येणेंप्रमाणें:-

 " बौद्ध धर्मीतील ग्रन्थसंग्रह ६७७१ पुस्तकें झणजे अफाटच असल्यामुळे एका मनुष्याच्या हातून सर्व जन्मांतही तो वाचून व्हावयाचा नाहीं. परन्तु जो कोणी ह्या ग्रन्थसं- ग्रहाला त्याच्या भोवती तीन वेळ फिरवील, त्याला तो ग्रन्थसं- ग्रह सम्पूर्ण वाचल्याचें श्रेय येऊन तितर्फे पुण्य लागेल; व शिवाय आयुरारोग्यसंपदा याहीं करून तो सुखी होईल. "

 थोडें द्रव्य दिळे, जे कोणाही मनुष्याला हा ग्रन्थ- ग्रह फिरवूं देतात. पुण्यमार्ग सम्पादण्याच्या अनेक वेडगळ / पौरस्त्य कल्पनांपैकी ही एक आहे. परन्तु तिबेटांतील लो- कांनीं ह्याहीपेक्षां जबर युक्ति लढवून श्रम न करितां पुण्य जोडण्याचें श्रेय घेण्याचा राबता पाडला आहे. ते आ- पलीं प्रार्थनाच याऱ्याकडून किंवा पाण्याकडून फिरवून घेतात. जपानी लोक ग्रंथसंग्रह स्वतः फिरविण्याचे श्रम तरी घेतात.

 शिंटोधर्म व बौद्धधर्म हे आतां बहुतेक एकवटून गेल आहेत. जेथें शिंटो देवाची चिन्हें असतात, तेथेंच शेजारी 'बुद्धाच्या मूर्ति असतात.

 गेल्या शतकांत व ह्या शतकांत पुष्कळ जपानी विद्वां- नांनी शिंटो धर्माचें पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आहे.