पान:जपानचा इतिहास.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
जपानचा इतिहास.

करीत नाहीत. ताईत भालदोरे देत नाहींत. ते बुद्धाला भजतात. बुद्धाची उपासना करून सुचरितामध्यें काळ घालविणें हेंच ते आपलें कर्तव्यकर्म समजतात.

 शिनशियु पंथाचे लोक ' अमिद बुद्धाला' मानितात. 'गौतमबुद्धाला ' मानीत नाहींत. काश्मीरातले टोक प्रथमतः 'ह्या 'अमिदबुद्धाची' आराधना करूं लागले. हा अभिदबुद्ध पश्चिम दिशेला एका रमणीय उद्यानामध्ये सर्व सुखांचा अनुभव घेत राहिला आहे, असे त्या पंथाचे लोक समजतात. त्याच्या भजकांनी पूर्ण भक्तिमान् होऊन जर त्याची प्रार्थना केली, तर त्याच्या पुष्कळ सुखापैकीं कांहीं अंश त्यांना मिळतो. ' नमू - अमिद - बुद्सु ' हा त्यांचा प्रार्थनेचा पाठ आहे.

 जपानांत बुद्धाच्या मूर्ति भारी अजस्र आहेत. कामाकूरा येथें जी मूर्ति आहे, ती बत्तीस हात उंच आहे. ती सुमारें ६-६॥ शें वर्षांपूर्वी घडली गेली असें ह्मणतात. कांशाचे निरनिराळे पत्रे एकत्र जोडून ती मूर्ति केलेली आहे. तिचे डोळे सोन्याचे आहेत. सर्व डोक्यावर टेंगळे आल्याप्रमाणे रुपयाची टोपणें आहेत. बुद्ध उन्हामध्ये तपश्चर्या करीत बसला असतां, त्याचे उन्हाच्या तापापासून रक्षण व्हावे हाणून गोगलगाई त्याच्या डोकीवर बसल्या होत्या, अशी दंतकथा आहे. रुप्याची टोपणें त्याच ह्या गोगलगाई. ही मूर्ति पत्र्याची असल्यामुळे पोकळ आहे; व तिच्या अंतर्भागांत बौद्धधर्मीय earth प्रकारच्या मूर्ति ठेवल्या आहेत.

 आणखी दुसरी नारा येथें एक मूर्ति आहे. ही तर ह्याहीपेक्षा अजस्र आहे. तिची उंची ५३ ॥ फूट आहे. तिचें तोड १६ फूट लांब आहे व तिचे खांदे २८ फूट रुंद आहेत.