पान:जपानचा इतिहास.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २१ वै.

११९


शिंटो देव हे बुद्धाचेच अवतार अशी लोकांच्या मनांत कल्प- ना भरवून देऊन दोन्ही धर्माचा मिलाफ करण्याचा प्रयत्न चालविला. ह्या युक्तीनें मिकाडो ' साग' हा बराच खुष झाला, व त्यानें त्या धर्मास ' रियावो - शिंटो' ह्मणजे ' दूयर्थ करी प्रमेय ' असें नांव दिलें. बौद्ध पुजान्यांच्या हवाली पुष्कळ शिंटो देवालयें करण्यांत आलीं, व आपापल्या आवडीप्रमाणें त्यांनी त्यांस बौद्ध धर्मातील देवालयाचे स्वरूप दिलें.

 जपानांतील बौद्धधर्म सीलोन व सयाम येथील बौद्ध- धर्माहून बहुत निराळा आहे. जपानी बौद्धांचा धर्मग्रंथ 'महा- यान' या नांवाचा आहे.' बौद्धधर्मात एकंदर दोन मुख्य भेद आहेत; ते तेराव्या शतकांत उत्पन्न झाले.

 ह्यांतील एकाचा उत्पादक 'निचीरेन' नांवाचा एक गृहस्थ होऊन गेला. त्याच्या पंथाचे लोक मोठे हट्टी व निग्रही असतात. त्यांच्यांत हात्रांचे महत्व फार आहे. ताईत भाल- दारे वगैरे प्रचार त्या पंथांत विशेष असतात. त्यांच्यांतील जति लग्न करीत नाहींत व मद्यमांसाला शिवतसुद्धां नाहींत. " निचिरेनने ' बुद्धाच्या नांवानें प्रार्थना करण्याचें बन्द करून धर्मपुस्तकाच्या नांवानें प्रार्थना करण्याचा परिपाठ पाडला.

 दुसन्या भेदाचा उत्पादक 'शिन्शन' नांवांचा होऊन * गेला. त्याच्या पंथाचे लोक आपणाला 'शिनशियु' ह्मणजे या पंथाचे असें ह्मणवून घेतात. त्यांच्या भटांना लग्नाची परवानगी असते. ते कोणच्या पाहिजे त्याप्रकारचें भन्न खातात; तपश्चर्या वगैरे देहदंडन करीत नाहींत. यात्रा