पान:जपानचा इतिहास.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
जपानचा इतिहास.

धर्माचा प्रवेश झाला आहे. इ. स. ५५० च्या सुमारास एका कोरियन राजानें जपानच्या निकाडोला एक बुद्धाची सुवर्णमयी मूर्ति व कांहीं बौद्ध धर्मशास्त्राची पुस्तकें नजर पाठविली. परंतु ती परत करण्याविषयीं मिकाडोच्या मंत्रि- मंडळानें मिकाडोला फार भीड घातली. त्यावरून तीं दोन्हीं त्यानें एका सरदाराजवळ दिलीं. आपणाजवळ ठेवलीं नाहींत. त्या सरदारार्ने एक देवालय बांधून त्यांत बुद्धाची मूर्ति ठेवली. परंतु पुढें कांहीं दिवसांनीं कांही एका रोगाची साथ आली. तेव्हां ती साथ येण्यास हे देऊळच कारण असा शिंटोच्या भक्तांनीं मोठा गिल्ला केला; व लोकांचीं मर्ने क्षुब्ध झाली. त्यामुळे तें देऊळ पाडून टाकावें लागलें. परंतु त्यानंतर राष्ट्रामध्यें अशा एकामागून एक भयंकर गोष्टी घडून आल्या की, नंतर लवकरच पुनः तें देऊळ बांधण्याची परवानगी द्यावी लागली. त्यानंतर बौद्धधर्माचा पगडा चांगलाच बसला. कोरियांतून बौद्ध योगिनी व यति भराभर येऊन जपानांत ठिकठिकाणी विहार बांधून राहू लागले. इ. स. ५९३ पासून ६२१ पर्यंत जो मिकाडो जपानच्या गादीवर होता तो पक्का बौद्धधर्मी बनला व त्या वेळेपासून अनेक शतकें बौद्धधर्म जपानांत मोठा जोरावर होता.

 जपानी शिंटो धर्मापेक्षां बौद्धधर्मामध्यें परमेश्वराच्या आराध- नेसंबंधानें एकेक समारंभ भव्य असल्यामुळे व बौद्धधर्माची नीती - मत्ता विशेष असल्यामुळे सकृद्दर्शनी जपानी लोकांवर बौद्धधर्माचा चांगलाच परिणाम झाला. परंतु हिरकन लिपी शोधून काढणारा जो कोबो दायशी बुद्ध यति त्याच्या वेळेपर्यंत त्या धर्माचा प्रसार सामान्य लोकांमध्ये यथायथाच झाला होता, त्यानें