पान:जपानचा इतिहास.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २१ वें.

११७


स्पतींचे देवाचे नैवैद्य तयार करणें व ते देवाला अर्पण करण आणि जुन्या जपानी भाषेत देवाची प्रार्थना हाणणें; हेंच काय तें विशेष देवकार्य असतें. स्त्रिया देवापुढें नृत्य करितात. ज्या जुन्या जपानी भाषेत ते लोक प्रार्थना ह्मणतात, ती भाषा सामान्य जनांना कळण्यासाखी नसते. कागदाच्या चिट्या त्या त्या देवळाचे पुजारी त्या त्या देवाचें नांव छापून विक्री- कांतां ठेवितात, लोक त्या चिठ्या विकत घेऊन रलेल्या समजून जवळ बाळगतात; किंवा देव्हाऱ्यांत पूजितात.

 शिंटो देवांना गायनवादनादि करमणूक फार प्रिय आहे. ह्यासाठी त्यांचे भक्त यात्रेच्या वगैरे प्रसंगी देवाकरितां नाटकें करितात; व नाना तऱ्हेचे प्रेक्षणीय खेळ करितात. जपानी लोकांना नेहमीं असें वाटतें कीं, आपल्यावर एक- सारखा पापाचा बोजा चढत आहे व तो काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरितां वर्षातून दोनदां आइस येथे जत्रा भरितात, व त्या योगानें पूर्वीच्या सहा महिन्यांचे पाप धुवून गेलें असें ते समजतात.

 बौद्धधर्म शिंटोधर्म हा जपानचा नांवाला धर्म आहे. बाकी बौद्ध धर्माचा संस्कार त्या लोकांच्या मनावर विलक्षण झाला असल्याकारणानें आपण शिंटो पंथाचे ह्मणून ह्मण- विणारांचे कलसुद्धां त्यांना न कळत बौद्ध धर्माला अनुकूल झाले आहेत. ह्या गोष्टीचा पडताळा आमच्या हिंदुस्थानांत सुद्धां पहावयास सांपडेल.

 बौद्ध धर्म हा मूळचा हिंदुस्थानांतला हे सांगावयास नको- च. हिंदुस्थानांतून तिबेटांत, तिबेटांतून चिनांत, चिनां - तून कोरियांत व कोरियांतून जपानांत अशा क्रमानें बौद्ध