पान:जपानचा इतिहास.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
जपानचा इतिहास.

 देवळाच्या समोर बहुधा दुसरी एक इमारत असते. ही प्रार्थनेची जागा, कोठें कोठें चार बाजूला चार खांब रोवून त्याच्यावर छप्पर चढविलेलें अशीच ही पडवी वजा इमा- रत अगदी साधी असते. ह्या इमारतीच्या तोंडाला घंटा बांधलेली असते. देवाचें आपल्या प्रार्थनेकडे लक्ष aria aणून भक्त लोक ही घांट तिच्या लोळीस बांध- लेल्या दोरीने वाजवितात. देवळापाशीं आसपासच पाण्याचा एक हौद असतो, त्यांत हात पाय तोंड वगैरे धुवून नंतर आपले डोकें खाली करून देवाचा भक्त प्रार्थनेला मुका- व्यानेंच सुरवात करितो. प्रार्थना संपल्यानंतर देवापुढें यथा- शक्त्या द्रव्य ठेऊन तो टाळी वाजवितो व देवाला असें सुचवितो की, 'हे परमपूज्य विभो, आतां आपलें लक्ष दुसरी- कडे गेलें तरी कांहीं हरकत नाहीं. माझी प्रार्थना झाली. '

 शिंटो पुजारी पूजेच्या वेळेला एक विवक्षित तऱ्हेचा पोषाक घालतात. त्यांचा आगरखा लांब व बराच पोकळ असून ह्या आंगरख्याच्या अस्तन्या बऱ्याच सैल असतात. त्यांच्या अंगरख्याच्या वर कंबरेला कंबरपट्टा बांधलेला असतो, त्यांच्या डोकीला एक काळी टोपी असून ती ग ळ्याला बांधलेली असते. त्यांना लग्न करण्याविषयीं मनाई नाहीं. त्याचप्रमाणे वाटेल त्यावेळीं त्यांस दुसऱ्या को- णत्याही धंद्यांत शिरतां येतें. कांहीं देवळांमध्ये पुजा- यांना देवकार्यात मदत करण्याकरितां बायका अस- तात. त्यांनांही वाटेल त्यावेळी लग्न करून संसार करूं लागण्यास आडकाठी नसते. व त्याही केव्हां वाटेल त्या वेळी दुसरा धंदा पत्करूं शकतात. मद्यमांसाचे व वन-